शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

लालूप्रसाद यादव तुरुंगात करणार माळीकाम, दर दिवशी मिळणार एवढे वेतन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2018 12:31 IST

चारा घोटाळ्यात साडे तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झालेल्या लालूप्रसाद यादव यांची रांची येथील बिरसा मुंडा कारागृहात रवानगी झाली आहे. आता लालूप्रसाद यादव यांना  हजारीबाग येथील खुल्या कारागृहात पाठवण्यात येणार आहे.  तुरुंगात एक कैदी म्हणून लालू यादव यांना माळीकाम देण्यात आले आहे...

पाटणा - चारा घोटाळ्यात साडे तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झालेल्या लालूप्रसाद यादव यांची रांची येथील बिरसा मुंडा कारागृहात रवानगी झाली आहे. आता लालूप्रसाद यादव यांना  हजारीबाग येथील खुल्या कारागृहात पाठवण्यात येणार आहे.  तुरुंगात एक कैदी म्हणून लालू यादव यांना माळीकाम देण्यात आले असून, त्यासाठी त्यांनी वेतनही मिळणार आहे. प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या वृत्तांनुसार लालू यादव यांना माळीकामासाठी दररोज 93 रुपये एवढा मेहनताना मिळणार आहे. लालू प्रसाद यादव यांना चारा घोटाळ्याप्रकरणी शिक्षा झाल्यानंतर या शिक्षेला आव्हान देण्यासाठी राष्ट्रीय जनता दलाने उच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे.  चारा घोटाळ्याशी संबंधित २१ वर्षांपूर्वी दाखल केल्या गेलेल्या फौजदारी खटल्यात येथील सीबीआय विशेष न्यायालयाने बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) प्रमुख लालू प्रसाद यादव यांना शनिवारी साडेतीन वर्षांचा तुरुंगवास आणि १० लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली होती. चारा घोटाळ्यात लालूंना झालेली ही दुसरी शिक्षा आहे.  या खटल्यात लालूंसह १६ आरोपींना २३ डिसेंबर रोजी दोषी ठरविण्यात आले होते. न्या. शिवपाल सिंग यांनी शनिवारी दुपारी ‘व्हिडीओ कॉन्फरन्स’ माध्यमाने शिक्षा सुनावली. लालूंना भारतीय दंड विधान व भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमांन्वये सर्व मिळून साडेतीन वर्षांचा कारावास देण्यात आला.  काय आहे चारा घोटाळापूर्वी बिहारमध्ये व आता झारखंडमध्ये असलेल्या देवघर येथील सरकारी तिजोरीतून, सन १९९१ ते १९९७ या काळात खोटी बिले बनवून फसवणुकीने ८९.२७ लाख रुपये काढून अपहार केल्याच्या संदर्भात हा खटला होता. प्रत्यक्षात चाºयाचा पुरवठा न करताच कंत्राटदारांच्या नावे असे पैसे काढले जात असल्याचे माहीत असूनही मुख्यमंत्री या नात्याने लालूंनी त्याकडे कानाडोळा केला, असा त्यांच्यावर आरोप होता. या घोटाळ्याच्या एकूण ३३ खटल्यांपैकी सहा खटल्यांमध्ये लालू प्रसाद आरोपी होते. त्यापैकी दोन खटल्यांमध्ये त्यांना शिक्षा झाली आहे. अन्य चार खटल्यांचे कामकाज याच न्यायालयात सुरू आहे. याआधी चैबासा तिजोरीतून झालेल्या ३७.५ कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणी लालूंना पाच वर्षांची कैद व २५ लाख रुपयांचा दंड अशी शिक्षा झाली होती.सन २०१३ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने लालूंना त्या खटल्यात जामीन दिला. पण शिक्षेला स्थगिती न दिली गेल्याने त्यांना ११ वर्षे कोणतीही निवडणूक न लढण्याची अपात्रता लागू झाली. नव्या शिक्षेने त्यांच्या अपात्रतेचा कालावधी आणखी सहा वर्षांनी वाढेल. गेले दोन आठवडे लालू बिरसा मुंडा कारागृहात आहेत. 

टॅग्स :Lalu Prasad Yadavलालूप्रसाद यादवCorruptionभ्रष्टाचारIndiaभारत