Lalu Prasad Yadav: तेजस्वी की तेजप्रताप? लालू प्रसादांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2021 15:56 IST2021-10-29T15:55:40+5:302021-10-29T15:56:09+5:30
Tejaswi Or Tejpratap Yadav? मी माझ्या सत्ताकाळात 15वर्षे स्थिर सरकार दिले. गरिबांना त्यांचा हक्क दिला, असे सांगत लालू यांनी नितिशकुमार यांच्यावर तोंडसुख घेतले.

Lalu Prasad Yadav: तेजस्वी की तेजप्रताप? लालू प्रसादांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा
पाटणा : राजद सुप्रीमो लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांनी आपल्या उत्तराधिकाऱ्याची घोषणा केली आहे. बिहारच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून लालू पूत्रांमध्ये वाद असल्यावरून खळबळ उडाली होती. तेजस्वी यादव आणि तेजप्रताप यादव (Tejpratap Yadav) यांचे समर्थक वेगळे झाल्याने राजद फुटीच्या उंबरठ्यावर होता. दोघांचेही समर्थक एकमेकांचे पोस्टर काढून त्या जागी आपल्या नेत्यांचे पोस्टर लावत होते. आता लालू यांनीच वारसदार कोण असेल ते स्पष्ट केल्याने कार्यकर्त्यांची फरफट थांबण्याची शक्यता आहे.
तेजस्वी यादव (Tejasvi Yadav) हाच आपला उत्तराधिकारी असेल असे लालू यांनी आज स्पष्ट केले. सर्वांनी त्याचा स्वीकार केला आहे. दोन्ही भाऊ चांगले चालले आहेत. ते एकत्रच आहेत, असे सांगत लालू यांनी नितिशकुमार यांच्यावर तोंडसुख घेतले. विसर्जन म्हणजे गोळी मारणे असा होत नाही असे ते म्हणाले. तसेच त्यांना आम्ही गोळी का मारू, ते स्वत:च संपवून घेत असतील तर असे ते म्हणाले. भकचोन्हर म्हणजे असमजूतदार, मूर्ख असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे काही अपमान वगैरे होत नाही. ही काही शिवी नाहीय, हवेतर डिक्शनरी वाचा, असे लालू म्हणाले.
लालू म्हणाले की, मी माझ्या सत्ताकाळात 15वर्षे स्थिर सरकार दिले. गरिबांना त्यांचा हक्क दिला. बिहारमध्ये राजदमध्ये आपला उत्तराधिकारी हा तेजस्वीच असेल, असे लालू यांनी एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले आहे. तेजप्रतापला भाजपाचे लोक फितवत आहेत. अशाप्रकारे चर्चा घडवून आणत पिता-पुत्रांमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप लालू यांनी केला.