शहरं
Join us  
Trending Stories
1
इम्रान खान कुठे आहेत? पाकिस्तान संसदेत पीटीआयचा गदारोळ; बहिणी तुरुंगाबाहेच बसून...
2
"२ तारखेपर्यंत मला युती टिकवायचीय"; शिवसेनेसोबतच्या वादावर रविंद्र चव्हाणांचे मोठे राजकीय संकेत...
3
WPL 2026 Auction : अनुष्का शर्माचं नाव येताच RCB तिच्या मागून धावला! पण खर्च नाही झेपला अन्...
4
“भाजपा पैसे वाटल्याशिवाय जिंकू शकत नाही, भविष्यात महायुती टिकणार नाही”: विजय वडेट्टीवार
5
ट्रेनमध्ये प्रवास करताना नेटवर्क का जाते? इंटरनेट का होते स्लो? जाणून घ्या 'या' समस्येवरचा उपाय
6
एकपेक्षा जास्त लग्न करणे गुन्हा...'या' राज्यात विधेयक मंजूर; दंडासह कठोर शिक्षेची तरतूद
7
ॲपल अडकली? भारतात ₹३.२० लाख कोटी दंडाची टांगती तलवार; कायदा बदलला अन्...
8
३०० सीट वाढणार, ४ कोच कायमस्वरुपी जोडले जाणार; वंदे भारत ट्रेनला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद
9
मन हेलावून टाकणारी घटना...! पती, पत्‍नी, प्रियकर अन् एक अजब करार...! सर्वत्र होतेय चर्चा 
10
टाटा सिएरा खरेच ₹११.४९ लाखांना मिळणार? नेक्सॉन, हॅरिअरलाच खाऊन टाकणार..., हो, नाही...
11
अरेच्चा! भारतीयांना 'हे' शब्द नीट उच्चारताच येत नाही; तुम्ही Croissant, Ghibli चा उच्चार चुकवता?
12
Hong Kong Fire : अग्निकल्लोळ! हाँगकाँगमध्ये इमारतीला कशी लागली एवढी मोठी आग? ५५ जणांचा मृत्यू, २७९ जण बेपत्ता
13
अजय देवगणच्या अश्लील डीपफेकवर दिल्ली हायकोर्टाचा मोठा आदेश, अभिनेत्यालाही केले सवाल
14
घुसखोरांना मतदानाचा अधिकार द्यायचा का? SIR प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाची महत्वपूर्ण टिप्पणी
15
WPL 2026 Auction : होऊ द्या खर्च! मुंबई इंडियन्सनं Amelia Kerr साठी निम्मी पर्स केली रिकामी
16
याला म्हणतात ढासू शेअर...! 5 वर्षांत 2 रुपयांच्या स्टॉकनं केलं करोडपती, दिला 93806.67% चा बंपर परतावा
17
भयानक...! हाँगकाँगच्या गगनचुंबी आगीत अद्याप २७९ हून अधिक लोक बेपत्ता; ५५ मृतदेह सापडले, ७६ गंभीर...
18
वळणावर 'ती' ट्रेन आली अन् होत्याचं नव्हतं झालं; चीनमध्ये रेल्वे अपघातात ११ कर्मचाऱ्यांचा मृत्यू
19
मिठी मारली, कपाळाचं चुंबन घेतलं अन् गळ्यावर फिरवला...; नववधूला प्रियकरानेच क्रूरपणे संपवले!
20
“न्याय मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही”; नीलम गोऱ्हे यांनी घेतली गौरी पालवे कुटुंबीयांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

मन हेलावून टाकणारी घटना...! पती, पत्‍नी, प्रियकर अन् एक अजब करार...! सर्वत्र होतेय चर्चा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 19:02 IST

पोलिसांनीही तिला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचाही काही परिणाम झाला नाही. कारण महिला आपल्या निर्णयावर ठाम होती...

उत्तर प्रदेशातील ललितपूर जिल्ह्यातून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील पाली येथील ही घटना सध्या चर्चेचा विषय बनली आहे. येथे एका पाच मुलांच्या आईने पती आणि मुलांना सोडून प्रियकरासोबत नवा संसार थाटला आहे. संबंधित महिला गेल्या चार महिन्यांपासून माहेरी राहत होती. जेव्हा पती तिला घेण्यासाठी गेला, तेव्हा तिने परत येण्यास नकार दिला. सुमारे एक महिन्यापूर्वी १५ नोव्हेंबरला ही महिला आपल्या पतीला आणि मुलांना सोडून प्रियकरासोबत पळून गेली होती.

काही दिवस लपून राहिल्यानंतर, ती महिला आपल्या प्रियकरासोबत परत गावात आली आणि उघडपणे एकत्र राहू लागली. यामुळे, पत्नीचा सातत्याने शोध घेत असलेला पाच मुलांचा बाप पार खचला. तो थेट प्रियकराच्या घरी पोहोचला. त्याने पत्नीची प्रचंड समजूत घातली, मुलांच्या शपथा दिल्या. मात्र, महिलेवर काहीच परिणाम झाला नाही. पतीला रिकाम्या हातानेच परतावे लागले.

बाप लहान दुधपिणाऱ्या बाळाला छातीशी लावून आणि इतरांचे बोट धरून घरी परतला. पोलिसांनीही तिला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचाही काही परिणाम झाला नाही. कारण महिला आपल्या निर्णयावर ठाम होती. महत्वाचे म्हणजे, तिचा प्रियकर देकील विवाहित असून एका मुलाचा बाप आहे, ज्याची पत्नी दोन वर्षांपूर्वी त्याला सोडून गेली आहे.

अजब करार -प्रचंड समजावून, विनंती करूनही पत्नी राजी झाली नाही. यामुळे अखेर एक विचित्र करार करण्यात आला. या आईने आपल्याच मुलांची वाटणी केली. तिने तीन मुले आपल्याजवळ ठेवली, तर दुधपिणाऱ्या बाळासह दोन मुले पतीला दिली. विशेष म्हणजे, ही सर्व मुले १२ वर्षांपेक्षाही लहान आहेत. प्रेमासाठी पोटच्या मुलांना आई-बापाच्या मायेपासून वंचित करणाऱ्या या महिलेची संपूर्ण गावात चर्चा सुरू आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Heartbreaking! Wife leaves husband, kids for lover; strange agreement!

Web Summary : In Uttar Pradesh, a mother of five left her husband for her lover. After failed attempts to reconcile, they agreed to split the children. She kept three, while the husband got two, including the infant. The incident is a major talking point in the village.
टॅग्स :Love Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसhusband and wifeपती- जोडीदार