ललित मोदीच्या पत्नीचे कॅन्सरने निधन; ट्विटरवर श्रद्धांजली व्यक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2018 20:56 IST2018-12-11T20:35:00+5:302018-12-11T20:56:58+5:30

आयपीएलमध्ये घोटाळा केल्याप्रकरणी ललित मोदी मागील आठ वर्षांपासून भारतामधून फरार आहे.

Lalit Modi's wife dies of cancer; Express tribute on twitter | ललित मोदीच्या पत्नीचे कॅन्सरने निधन; ट्विटरवर श्रद्धांजली व्यक्त

ललित मोदीच्या पत्नीचे कॅन्सरने निधन; ट्विटरवर श्रद्धांजली व्यक्त

मुंबई : आयपीएल घोटाळ्यातील आरोपी ललित मोदी याच्या पत्नीचे निधन झाले आहे. याबाबतची माहिती मोदीनेच ट्विटरवर भावनिक पोस्ट लिहीत दिली आहे.


मिनल मोदी ही गेल्या 20 वर्षांपासून कर्करोगाने ग्रस्त होती. या आजारमुळेच त्यांच्या मृत्यू झाला. लंडनमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. ललित मोदी आणि मिनल यांच्या लग्नाला 27 वर्षे झाली होती. त्यांचे 1991 मध्ये लग्न झाले होते. 


 ‘तू माझं प्रेम, जगणे आणि सहचारीणीही होतीस. तुला तेथून आमच्याकडे पाहत असशील. तूच माझे आयुष्य होतीस आणि प्रवासही होतीस. तुला दिलेले वचन मी नक्की पूर्ण करेन. आपल्या मुलांची काळजी घेईल, त्यांचे पालनपोषण नीट करेल. या सर्वांत तू सोबत असशील याची खात्री आहे. पण हे सर्व कठीण असेल.’ अशी पोस्ट ललित मोदीने लिहिली आहे. 






आयपीएलमध्ये घोटाळा केल्याप्रकरणी ललित मोदी मागील आठ वर्षांपासून भारतामधून फरार आहे.
 

Web Title: Lalit Modi's wife dies of cancer; Express tribute on twitter