पंतप्रधानांनी लिहिलेल्या ‘गरबा’ला लाखो व्ह्यूज

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2023 05:56 IST2023-10-16T05:56:21+5:302023-10-16T05:56:31+5:30

पंतप्रधानांनी लिहिलेल्या या गाण्याला मीत ब्रदर्सने संगीत दिले आहे, तर दिव्य कुमारने ते गायले आहे.

Lakhs of views on 'Garba' written by the Prime Minister Narendra Modi | पंतप्रधानांनी लिहिलेल्या ‘गरबा’ला लाखो व्ह्यूज

पंतप्रधानांनी लिहिलेल्या ‘गरबा’ला लाखो व्ह्यूज

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलेले गरबा गाणे रविवारी रिलीज झाले. या गरब्याला लोकांची पसंती मिळत असून, बॉलिवूड तारेही प्रशंसा करत आहेत. हे गाणे गुजराती भाषेत लिहिण्यात आले आहे. सध्या हे गाणे सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, काही तासांतच त्याला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत.

   पंतप्रधानांनी लिहिलेल्या या गाण्याला मीत ब्रदर्सने संगीत दिले आहे, तर दिव्य कुमारने ते गायले आहे. नवरात्रोत्सव सुरू होण्यापूर्वी हे गाणे रिलीज करण्यात आले. पंतप्रधान म्हणाले की, नवरात्राच्या खास प्रसंगी मी लिहिलेले गरबा गाणे शेअर करताना मला खूप आनंद होत आहे. यासोबतच त्यांनी मीत ब्रदर्स आणि दिव्य कुमार यांचे आभार मानले आहेत. हे गाणे चित्रपट निर्माता जॅकी भगनानी यांच्या जस्ट म्युझिकने रिलीज केले आहे. 

नवरात्रीनिमित्त शुभेच्छा
पंतप्रधानांनी रविवारी नवरात्रानिमित्त लोकांना शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, ‘शक्ती देणारी आई दुर्गा, प्रत्येकाच्या जीवनात आनंद, समृद्धी, चांगले भाग्य व चांगले आरोग्य घेऊन येवो.’ नवरात्रोत्सव देशभर धूमधडाक्यात साजरा केला जातो व त्यानंतर दसरा सण येतो.

Web Title: Lakhs of views on 'Garba' written by the Prime Minister Narendra Modi