शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
2
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
3
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
4
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
5
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
6
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
7
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
8
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
9
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
10
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
11
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
12
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
13
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
14
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
15
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
16
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
17
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
18
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
19
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
20
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा

लखीमपूर खिरी हिंसाचार:अलाहाबाद उच्च न्यायालयाची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी, जामीनप्रकरणी निर्णय ठेवला राखून

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2022 08:20 IST

Lakhimpur Khiri Violence: लखीमपूर खिरी हिंसाचारातील आरोपी आशिष मिश्रा यांना जामीन देण्याच्या अलाहाबाद  हायकोर्टाच्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाने प्रश्न उपस्थित केले.

नवी दिल्ली - लखीमपूर खिरी हिंसाचारातील आरोपी आशिष मिश्रा यांना जामीन देण्याच्या अलाहाबाद  हायकोर्टाच्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाने प्रश्न उपस्थित केले. सुनावणी सुरू नसताना शवविच्छेदनाचा अहवाल, जखमांचे स्वरूप अशा तपशिलांवर विचार करायला नको होता, असे सुप्रीम कोर्ट म्हणाले.आशिष हे केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचे पुत्र आहेत. आशिष यांचा जामीन रद्द करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवरील निर्णय राखून ठेवताना सरन्यायाधीश एन. व्ही. रमण, न्या. सूर्यकांत आणि न्या. हिमा कोहली यांच्या विशेष न्यायपीठाने सरकारने हायकोर्टाच्या आदेशाविरुद्ध अपील दाखल न केल्याची दखल घेतली. न्यायाधीश शवविच्छेदन अहवाल आणि आदींचा विचार कसा करू शकतात, असे विचारले.शेतकऱ्यांच्या वतीने बाजू मांडणारे वरिष्ठ विधिज्ञ दुष्यंत दवे आणि प्रशांत भूषण यांच्या युक्तिवादाची न्यायपीठाने दखल घेतली. हायकोर्टाने व्यापक आरोपपत्रांवर विचार केला नाही. एफआयआरवरच विसंबून राहिल्याचा युक्तिवाद दवे आणि भूषण यांनी केला.सुनावणीच्या सुरुवातीला राज्य सरकारच्या वतीने विधिज्ञ महेश जेठमलानी म्हणाले की, जामिनाविरुद्ध अपील दाखल करण्यासाठी एसआयटीचा अहवाल शुक्रवारी अधिकाऱ्यांशी सामायिक करण्यात आला होता. हायकोर्टाच्या एकल खंडपीठाने १० फेब्रुवारीला मिश्राला जामीन दिला होता. 

टॅग्स :Courtन्यायालयSupreme Courtसर्वोच्च न्यायालयLakhimpur Kheri Violenceलखीमपूर खीरी हिंसाचार