शहरं
Join us  
Trending Stories
1
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
2
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
3
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
4
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
5
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
6
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
7
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
8
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
9
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
10
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
11
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
12
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
13
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
14
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
15
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
16
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
17
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
18
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
19
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
20
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...

Lakhimpur Kheri Violence: Ashish Mishraची माहिती देण्यास ग्रामस्थांचा दहशतीमुळे नकार, मंत्र्यांच्या बनवीरपूर गावातील चित्र

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2021 9:56 AM

Lakhimpur Kheri Violence Update: उत्तर प्रदेशातील बनवीरपूर गावामध्ये ३ ऑक्टोबर रोजी कुस्तीच्या सामन्यांच्या जागी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा पुत्र आशिष उपस्थित होता का, याविषयी तेथील गावकरी दहशतीमुळे कोणाशीही फारसे काही बोलायला तयार नाहीत.

लखनऊ :  उत्तर प्रदेशातील बनवीरपूर गावामध्ये ३ ऑक्टोबर रोजी कुस्तीच्या सामन्यांच्या जागी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा पुत्र आशिष उपस्थित होता का, याविषयी तेथील गावकरी दहशतीमुळे कोणाशीही फारसे काही बोलायला तयार नाहीत. त्या दिवशी लखीमपूर खेरी येथे हिंसाचारात शेतकऱ्यांसह आठ जण ठार झाले. त्या घटनास्थळी  आशिष मिश्रा उपस्थित होता का, याबद्दलही गावकरी काही सांगायला तयार नाहीत. बनवीरपूर हे केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचे गाव आहे.केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा बनवीरपूर गावामध्ये दरवर्षी २  ऑक्टोबरला कुस्तींच्या सामन्यांचे आयोजन करतात. यंदा ३ ऑक्टोबरला सकाळी दहा वाजल्यापासून हे सामने भरविण्यात आले. उपमुख्यमंत्री केशव मौर्य त्या दिवशी दुपारी सव्वा दोनला बनवीरपूरला अजय मिश्रा यांच्या घरी जाणार होते. त्यानंतर कुस्तीच्या सामन्यांच्या ठिकाणी रवाना होणार होते. लखीमपूर खेरी हिंसाचाराबाबत काही व्हिडिओ समाजमाध्यमांवर झळकले असले तरी या घटनेनंतर इंटरनेट बंद करण्यात आल्याने आम्ही ते पाहिलेच नाहीत, असेही काही गावकरी म्हणाले. बनवीरपूर येथील ज्या प्राथमिक शाळेत कुस्त्यांचे सामने आयोजिण्यात आले होते, तेथील काही विद्यार्थ्यांनी मात्र ठामपणे सांगितले की, आशिष मिश्रा कुस्त्यांच्या ठिकाणी दिवसभर हजर होता. (वृत्तसंस्था)

...पण पुरावे नाहीतकुस्त्यांचे सामने संध्याकाळपर्यंत सुरू होते. त्यामुळे आपण त्याच ठिकाणी होतो, असा दावा आशिष मिश्रा याने पोलिसांकडे केला होता. पण त्याचे पुरावे तो देऊ शकला नाही. लखीमपूर खेरीतील तिकुनिया येथे हिंसाचार झाला, त्यावेळी आशिष मिश्रा नेमका कुठे होता याबद्दल बनवीरपूर गावामध्ये कोणीच माहिती द्यायला तयार होत नाही. 

टॅग्स :Lakhimpur Kheri Violenceलखीमपूर खीरी हिंसाचार