शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Lakhimpur Kheri Violence: लखीमपूर हिंसाचारातील मुख्य आरोपी असलेला केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा Ashish Mishra आला समोर, म्हणाला, मी तिथे असतो तर जिवंत राहिलो नसतो

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2021 13:42 IST

Lakhimpur Kheri Violence Update: या प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणून आरोप होत असलेला केंद्रीय मंत्री अजय मिश्रा टेणी यांचा मुलगा आशिष मिश्रा आज अखेर प्रसारमाध्यमांसमोर आला.

लखनौ - लखीमपूर खिरी येथे केंद्रीय मंत्री अजय मिश्रा टेनी यांनी केलेल्या एका वक्तव्याविरोधात सुरू झालेल्या आंदोलनाला रविवारी हिंसक वळण लागले. या हिंसाचारात चार शेतकऱ्यांसह एकूण आठ जणांचा मृत्यू झाला होता. (Lakhimpur Kheri Violence Update) दरम्यान, या प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणून आरोप होत असलेला केंद्रीय मंत्री अजय मिश्रा टेणी यांचा मुलगा आशिष मिश्रा आज अखेर प्रसारमाध्यमांसमोर आला. यावेळी त्याने आपली बाजू मांडताना आपण घटनास्थळी नसल्याचा दावा केला आहे. तसेच मी तिथे असतो तर आज जिवंत नसतो, असा दावा केला आहे. (Ashish Mishra The son of a Union Minister, the main accused in the Lakhimpur violence, came forward and said, "If I were there, I would not have survived.")

टाइम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीमध्ये लखीमपूर खीरी हिंसाचाराबाबत आशिष मिश्रा याने स्वत:चा बचाव केला आहे. तो म्हणाला की, या प्रकरणाची निष्पक्षपातीपणे चौकशी व्हावी. मी कुठल्याही प्रकारच्या चौकशीस तयार आहे. ईश्वराचा आशीर्वाद म्हणून सुदैवाने मी तिथे नव्हतो. जर तिथे असतो तर आज मी इथे तुमच्यासमोर नसतो.

लखीमपूरमधील हिंसाचारप्रकरणी केंद्रीय मंत्री अजय मिश्रा टेनी यांच्या मुलावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र आपण घटनास्थळी नसल्याचा दावा तो करत आहे. तो म्हणाला की, जेव्हा ही घटना घडली तेव्हा मी माझ्या गावात होतो. तिकोनिया येथे गेलो नव्हतो. आमच्या तीन कार्यकर्त्यांना बेदम मारहाण करून जिवे मारण्यात आले. तर ड्रायव्हरला जळत्या गाडीत ढकलण्यात आले. भारतातील शेतकरी असं करू शकत नाही.

लखीमपूर खीरीमध्ये नेमकं काय घडलंकेंद्रीय मंत्री अजय मिश्रा तेनी यांनी केलेल्या एका वक्तव्यावरून २५ सप्टेंबर रोजी हे आंदोलन सुरू झाले होते. एका कार्यक्रमाला जाताना अजय मिश्रा यांना आंदोलक शेतकऱ्यांनी काळे झेंडे दाखवले होते. तेव्हा शेतकऱ्यांनी वेळीच सुधरावं, अन्यथा त्यांना सुधारले जाईल, असा इशारा दिला होता. तेव्हापासून केंद्रीय मंत्र्यांविरोधात आंदोलन सुरू आहे.  दरम्यान, रविवारी उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य हे तेनी यांच्या उपस्थितीत एका सरकारी प्रोजेक्टच्या अनावरणासाठी येत असताना परिस्थिती अधिक चिघळली. शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री ज्या हेलिपॅडवर उतरणार होते त्या हेलिपॅडवर कब्जा केला. त्यानंतर कार्यक्रमाला जाण्यासाठी  रस्त्याने जायचे ठरवले. केशव प्रसाद मौर्य आणि तेनी यांनी दुपारी लखीमपूर येथे प्रकल्पाचे उदघाटन केले. त्यानंतर केंद्रीय मंत्री आपल्या बनवीरपूर यि गावाकडे रवाना झाले. तिथे कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र तत्पूर्वीच तिकुनिया येथे हा हिंसाचार घडला. तेव्हापासून येथील वातावरण तापलेले आहे. शेतकऱ्यांचा दावा आहे की, केंद्रीय मंत्री तेनी यांचा मुलगा आशिष कुमार मोनू हत्यारबंद समर्थकांसह त्या गाडीमध्ये होता ज्या गाडीने शेतकऱ्यांना चिरडले.  मात्र मोनू तिथून पळ काढण्यात यशस्वी ठरला. शेतकऱ्यांनी मंत्री तेनी आणि त्यांच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.  

टॅग्स :Lakhimpur Kheri Violenceलखीमपूर खीरी हिंसाचारUttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी