शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
2
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
3
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
4
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
5
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
6
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
7
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
8
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
9
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
10
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
11
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
12
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
13
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
14
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
15
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
16
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
17
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
18
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
19
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
20
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!

Lakhimpur Kheri Violence : भयंकर! ...अन् वेगाने आलेल्या मंत्र्याच्या कारने शेतकऱ्यांना चिरडलं; अंगावर काटा आणणारा नवा Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2021 10:58 IST

Lakhimpur kheri car thar new video viral : घटनेचे अनेक व्हिडीओ समोर येत असून वेगवेगळे दावे केले जात आहे. याच दरम्यान आता अंगावर काटा आणणारा आणखी एक नवा व्हिडीओ समोर आला आहे. 

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशच्या लखीमपूरमध्ये झालेल्या हिंसाचारात (Lakhimpur Kheri Violence) आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला आहे. हिंसाचारासंदर्भात केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तर दुसरीकडे काही शेतकरी नेत्यांनी आशिष मिश्राच्या अटकेची मागणी केली होती. अजय मिश्रा मात्र आपला मुलगा यामध्ये सहभागी नव्हता असं सांगत आहेत. कार आपल्याच मालकीची आहे याची कबुली देताना मिश्रा यांनी गाडीवर दगड, विटांचा हल्ला झाल्याने ताबा गेला आणि ही दुर्घटना झाली असा दावा केला आहे. या घटनेचे अनेक व्हिडीओ समोर येत असून वेगवेगळे दावे केले जात आहे. याच दरम्यान आता अंगावर काटा आणणारा आणखी एक नवा व्हिडीओ समोर आला आहे. 

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला असून यामध्ये एक थार गाडी वेगाने येऊन शेतकऱ्यांना चिरडून पुढे जात असल्याचं दिसत आहे. या व्हिडीओमध्ये शेतकरी हातात काळे झेंडे घेऊन एकत्र पुढे जात असलेले पाहायला मिळत आहेत. याचवेळी अचानक पाठीमागून एक गाडी वेगाने पुढे येथे आणि शेतकऱ्यांना चिरडून पुढे जाते. त्यानंतर त्यापाठोपाठ दोन आणखी गाड्या वेगाने निघून जातात. या घटनेने नंतर एकच गोंधळ उडतो. शेतकरी जीव वाचवण्यासाठी इकडे-तिकडे पळू लागतात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. या घटनेचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. काँग्रेससह इतर नेत्यांनी घटनेचा एक व्हिडीओ शेअर करत पंतप्रधान नरेद्र मोदींसह भाजपावर निशाणा साधला होता.

"शेतकऱ्यांना चिरडणारी ती कार आमचीच पण..."; अखेर केंद्रीय मंत्री अजय मिश्रांनी स्वत:च दिली कबुली

अजय मिश्रा टेनी यांनी कारबाबत महत्त्वाची कबुली दिली आहे. "शेतकऱ्यांना चिरडणारी ती कार आमचीच" असल्याचं म्हटलं आहे. "पहिल्या दिवसापासून आम्ही म्हणतोय की शेतकऱ्यांना चिरडणारी ती थार कार आमची आहे. ती आमच्या नावाने नोंदणीकृत आहे. ही कार काही कार्यकर्त्यांना घेऊन कोणाला तरी आणण्यासाठी जात होती. त्यावेळी माझा मुलगा दुसऱ्या ठिकाणी होता. तो सकाळी अकरा ते संध्याकाळपर्यंत दुसऱ्या कार्यक्रमाचे आयोजन करत होता. माझा मुलगा आशिष मिश्रा घटनास्थळी नाही तर कार्यक्रमस्थळी उपस्थित होता, तिथे हजारो लोक होते. त्याचे तिथले फोटो आणि व्हिडीओ देखील आहेत. जर तुम्हाला त्याचा कॉल रेकॉर्ड आणि सीडीआर, लोकेशन जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही सर्व काही तपासू शकता. हजारो लोक आशिष मिश्रा कार्यक्रमात होते, असा जबाब देण्यास तयार आहेत" असं अजय मिश्रा यांनी एनडीटीव्हीशी बोलताना म्हटलं आहे. 

"सरकार आक्रमण करतंय, शेतकऱ्यांना जीपखाली चिरडलं जातंय; त्यांची हत्या केली जातेय"

"शेतकऱ्यांना जीपखाली चिरडले जातंय, पंतप्रधान लखनऊमध्ये होते पण ते लखीमपूर खिरी येथे गेले नाहीत" असं म्हणत राहुल यांनी निशाणा साधला होता. राहुल गांधी यांनी "काही दिवसांपासून देशातील शेतकऱ्यांवर सरकार आक्रमण करत आहे. शेतकऱ्यांना जीपखाली चिरडले जात आहे. त्यांची हत्या केली जात आहे. भाजपा नेत्याच्या मुलावर कोणतीही कारवाई केली गेली नाही. दुसरीकडे पद्धतशीरपणे शेतकऱ्यांवर हल्ले केले जात आहेत. पंतप्रधान लखनऊमध्ये होते पण लखीमपूर खिरी येथे गेले नाहीत. दोन मुख्यमंत्र्यांच्या बरोबर मी लखीमपूर खिरी येथे जाण्याचा प्रयत्न करणार आहे" असं म्हटलं होतं.

 

टॅग्स :Lakhimpur Kheri Violenceलखीमपूर खीरी हिंसाचारFarmers Protestशेतकरी आंदोलनFarmerशेतकरी