उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खीरीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका व्यक्तीने गावकऱ्यांसमोरच आपल्या पत्नीचं तिच्या बॉयफ्रेंडशी लग्न लावून दिलं. निघासन पोलीस स्टेशन परिसरातील एका गावात ही घटना घडली. तीन मुलांची आईचे शेजारी राहणाऱ्या एका तरुणाशी प्रेमसंबंध होते. जेव्हा महिलेच्या पतीला हे समजलं तेव्हा त्याने घाबरून आपल्या पत्नीचं लग्न तिच्या बॉयफ्रेंडशी लग्न लावून दिलं आहे.
प्रेमसंबंधातून हत्या होत असल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. काही महिन्यांपूर्वी मुस्कान नावाच्या तरुणीने आपल्या नवऱ्याची हत्या करून तिचा मृतदेह हा निळ्या ड्रममध्ये ठेवला होता. तेव्हापासून लोकांना निळ्या ड्रमची भीती वाटू लागली आहे. याचाच धसका घेत आपल्यासोबत पत्नी आणि तिचा बॉयफ्रेंड काही वाईट करू नये म्हणून तिचं लग्न लावून दिल्याचं समोर आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, झारखंडमधील रहिवासी असलेल्या गुरनाम सिंहचं लग्न झालं होतं. गुरनाम शेतकरी आहे. गुरनामची मोठी मुलगी १८ वर्षांची आहे, तर दुसरी मुलगी ११ वर्षांची आहे आणि एक मुलगा १० वर्षांचा आहे. गुरनाम सिंहची पत्नी राजविंदर कौरचे शेजारी राहणाऱ्या सतनाम सिंहशी प्रेमसंबंध होते. गुरुनामला हे प्रकरण कळताच त्याने पत्नीचं सतनामशी लग्न लावून दिलं. राजविंदरच्या तीन मुलांचं संगोपन करण्याची जबाबदारी सतनामने घेतली आहे.
सतनाम सिंहने दिलेल्या माहितीनुसार, "माझ्या पत्नी आणि तिच्या बॉयफ्रेंडकडून माझ्या जीवाला आणि संपत्तीला धोका होता. यापूर्वी अशा अनेक घटना घडल्या आहेत ज्यात पतीची त्याच्या पत्नीच्या बॉयफ्रेंडने हत्या केली आहे. म्हणून भीतीपोटी मी माझ्या पत्नीचं लग्न तिच्या बॉयफ्रेंडशी करून दिलं. जेणेकरून ते दोघेही आनंदी राहतील आणि मीही जिवंत राहीन."
दोघांचेही सुमारे तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. सतनामने त्यांना खूप समजावण्याचा प्रयत्न केला पण पत्नीने ऐकलं नाही. तो पोलीस स्टेशनमध्ये गेला पण काहीच फायदा झाला नाही. शेवटी त्याने आपल्या पत्नीला तिच्या बॉयफ्रेंडच्या स्वाधीन केलं. गावकऱ्यांना बोलावलं आणि सर्वांसमोर त्यांचं लग्न लावून दिलं. या लग्नाची परिसरात जोरदार चर्चा रंगली आहे.