झोपेची कमतरता आरोग्यासाठीच नव्हे, अर्थव्यवस्थेसाठीही धोकादायक; भारताचे वर्षाला १५० अब्ज डॉलरचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2026 08:22 IST2026-02-16T08:21:56+5:302026-02-16T08:22:26+5:30

या समस्येचा फटका केवळ व्यक्तीच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यालाच बसत नाही, तर त्याचा उत्पादकतेवर परिणाम होऊन अर्थव्यवस्थेला १५० अब्ज डॉलर्सचा मोठा आर्थिक फटका बसत आहे.

Lack of sleep is not only dangerous for health but also for the economy; India loses $150 billion annually | झोपेची कमतरता आरोग्यासाठीच नव्हे, अर्थव्यवस्थेसाठीही धोकादायक; भारताचे वर्षाला १५० अब्ज डॉलरचे नुकसान

झोपेची कमतरता आरोग्यासाठीच नव्हे, अर्थव्यवस्थेसाठीही धोकादायक; भारताचे वर्षाला १५० अब्ज डॉलरचे नुकसान

नवी दिल्ली : सध्याच्या धावपळीच्या आणि तंत्रज्ञानावर आधारित जीवनशैलीचा मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून, झोपेची कमतरता ही एक जागतिक समस्या बनली आहे. मिळालेल्या अहवालानुसार, जागतिक लोकसंख्ये पैकी सुमारे १६ टक्के लोक निद्रानाशाचे शिकार आहेत. या समस्येचा फटका केवळ व्यक्तीच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यालाच बसत नाही, तर त्याचा उत्पादकतेवर परिणाम होऊन अर्थव्यवस्थेला १५० अब्ज डॉलर्सचा मोठा आर्थिक फटका बसत आहे.

भारताचा 'ई'शानदार विजय; पाकचा ११४ धावांवर चुराडा, टी-२० वर्ल्डकपमध्ये ९ पैकी ८ वेळा भारतच जिंकला

झोपेचा घटता आलेख आणि कारणे

गेल्या एका शतकात लोकांच्या झोपेची वेळ तब्बल

२ तासांनी कमी झाली आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम-लॅन्सेटच्या अभ्यासानुसार, १९१० मध्ये एक व्यक्ती सरासरी

९ तास झोपायची, ती वेळ २०२५ पर्यंत घटून ६.१० तासांवर आली आहे. स्मार्टफोन आणि हायस्पीड इंटरनेटच्या अतिवापरामुळे गेल्या दोन दशकांत झोपेची जागतिक सरासरी ६.८ तास आणि भारताची सरासरी ६.५ तास इतकी आहे.

भारताची चिंताजनक स्थिती

‘फिटबिट’च्या सर्वेक्षणात असे आढळले की, भारतीय जगातील सर्वांत कमी झोपणाऱ्या लोकांपैकी एक आहेत. सुमारे ५९ टक्के लोक रात्री ६ तासांपेक्षा कमी झोप घेत आहेत.

झोपेच्या कमतरतेमुळे भारताचे वार्षिक आर्थिक नुकसान १५० अब्ज डॉलर्स इतके होते, तर अमेरिकेला १३८ अब्ज डॉलर्स व जपानला ४११ अब्ज डॉलर्सचा फटका बसत आहे.

या समस्येचा फटका आरोग्य कर्मचारी, सुरक्षा रक्षक, पोलीस, मीडियाकर्मी

Web Title : नींद की कमी: भारत के लिए स्वास्थ्य और आर्थिक खतरा

Web Summary : नींद की कमी वैश्विक स्तर पर स्वास्थ्य और उत्पादकता को प्रभावित करती है। भारत को नींद में कमी के कारण 150 बिलियन डॉलर का वार्षिक आर्थिक नुकसान होता है। भारतीयों की औसत नींद 6.5 घंटे है, जो वैश्विक औसत से कम है, जिससे आर्थिक उत्पादन प्रभावित होता है।

Web Title : Sleep Deprivation: A Health and Economic Threat to India.

Web Summary : Sleep deprivation affects health and productivity globally. India faces $150 billion annual economic losses due to reduced sleep. Indians average 6.5 hours of sleep, less than the global average, impacting economic output.