तामिळनाडू : वणव्यामध्ये 9 जणांचा होरपळून मृत्यू, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2018 03:20 PM2018-03-12T15:20:38+5:302018-03-12T15:20:38+5:30

तामिळनाडूतील थेनी जिल्ह्यातील कुरंगानी जंगलात लागलेल्या वणव्यात मोठी जीवितहानी झाल्याचे वृत्त समोर आले आहे.

kurangani forest fire update rescue operation indian air force helicopter | तामिळनाडू : वणव्यामध्ये 9 जणांचा होरपळून मृत्यू, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू

तामिळनाडू : वणव्यामध्ये 9 जणांचा होरपळून मृत्यू, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू

Next

थेनी - तामिळनाडूतील थेनी जिल्ह्यातील कुरंगानी जंगलात लागलेल्या वणव्यात मोठी जीवितहानी झाल्याचे वृत्त समोर आले आहे.  जंगलात लागलेल्या वणव्यात एकूण 9 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये चार महिला, चार पुरुष आणि एका  लहान मुलाचा समावेश आहे. दरम्यान, बचाव पथकाला आतापर्यंत 28 जणांना सुखरुप वाचवण्यात यश आले आहे. यातील 10 जणांना किरकोळ तर 8 जणांना गंभीर दुखापत झाली आहे. जंगलात रविवारी ( 11 मार्च ) वणवा पेटला होता.

जंगलात पसरलेल्या वणव्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. बचाव कार्यामध्ये वायू सेनेचीही मदत घेतली जात आहे. वायू सेना हेलिकॉप्टरच्या मदतीनं जंगलातील या वणव्यात अडकलेल्यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 
 




Web Title: kurangani forest fire update rescue operation indian air force helicopter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Deathमृत्यू