Kuno National Park: मध्य प्रदेशातील कूनो राष्ट्रीय उद्यानातून पुन्हा एकदा आनंदाची बातमी समोर आली आहे. भारतातच जन्मलेल्या 33 महिन्यांच्या मादी चित्ता ‘मुखी’ने 5 शावकांना जन्म दिला आहे. भारतातील ‘प्रोजेक्ट चित्ता’साठी ही घटना अभूतपूर्व आणि ऐतिहासिक यश मानली जात आहे.
मुखी ही भारतात जन्मलेली पहिली मादी चित्ता असून, शावकांना जन्म देणारी पहिली भारतीय चित्ता होण्याचा मान मिळवला आहे. या ऐतिहासिक घटनेमुळे भारतातील चित्ता पुनर्वसन प्रकल्पाला मोठी गती मिळणार आहे.
मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्र्याकडून पुष्टी
कूनोतील या यशाची माहिती मुख्यमंत्री मोहन यादव आणि केंद्रीय वनमंत्री भूपेंद्र यादव यांनी ‘X’ वर पोस्ट करून दिली. सीएम मोहन यादव यांनी सांगितले की, “भारतामध्ये जन्मलेल्या मुखीने कूनो राष्ट्रीय उद्यानात पाच शावकांना दिला, ही ऐतिहासिक बाब आहे. आई आणि शावक पूर्णपणे निरोगी आहेत. भारताच्या चिता पुनर्वसन प्रकल्पासाठी ही एक मोठी उपलब्धी आहे.”
त्यांनी पुढे नमूद केले की, “33 महिन्यांची मुखी भारतात जन्मलेली पहिली मादी चित्ता आहे आणि आता भारतातच शावकांना जन्म देणारीही पहिली चित्ता ठरली आहे. यशस्वी प्रजननामुळे भारतीय पर्यावरणात या प्रजातीचे जुळवून घेणे, त्यांचे आरोग्य आणि भविष्यातील टिकाव क्षमता याबाबत सकारात्मक संकेत मिळतात. हे भारतातील चित्यांची संख्या वाढवण्याच्या उद्दिष्टाला बळकटी देईल.”
प्रोजेक्ट चितासाठी मोठा टप्पा
कूनो राष्ट्रीय उद्यानात गेल्या काही वर्षांपासून आफ्रिकन चित्त्यांचे पुनर्वसन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर भारतात जन्मलेली मादी चित्ता प्रौढ होऊन निरोगी शावकांना जन्म देणे, हे प्रकल्पाच्या यशाचे महत्त्वाचे चिन्ह मानले जात आहे. पर्यावरण तज्ज्ञांच्या मते, ही घटना भारतात चित्त्यांची स्थिर, नैसर्गिक आणि दीर्घकालीन संख्या निर्माण करण्याच्या दिशेने मोठी झेप ठरणार आहे. सध्या भारतात 27 चित्ते असून, 11 चित्त्यांचा जन्म भारतात झाला आहे. आता या 5 शावकांना मिळून, चित्त्यांची संख्या 32 वर पोहोचली आहे.
Web Summary : In a boost for Project Cheetah, Indian-born cheetah 'Mukhi' delivered five cubs at Kuno National Park. This marks a significant milestone, enhancing cheetah population and adaptation efforts in India. There are now 32 cheetahs in India.
Web Summary : प्रोजेक्ट चीता के लिए अच्छी खबर, भारत में जन्मी चीता 'मुखी' ने कूनो नेशनल पार्क में पांच शावकों को जन्म दिया। यह एक महत्वपूर्ण मील का पत्थर है, जो भारत में चीता आबादी और अनुकूलन प्रयासों को बढ़ाता है। अब भारत में 32 चीते हैं।