नका हो, तीन मुलांच्या आईसोबत माझे लग्न लावू नका, मी तर...; गावकऱ्यांनी काही ऐकले नाही, पठ्ठ्या लिव्ह इनमध्ये राहत होता...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 15:15 IST2025-05-22T15:13:27+5:302025-05-22T15:15:18+5:30
बिहारच्या भागलपूरची ही विवाहबाह्य संबंधांची स्टोरी सगळीकडे चर्चेत आली आहे. जेव्हा जेव्हा तिने त्याच्यावर दबाव टाकला तेव्हा तेव्हा कुंदन पळून जायचा.

नका हो, तीन मुलांच्या आईसोबत माझे लग्न लावू नका, मी तर...; गावकऱ्यांनी काही ऐकले नाही, पठ्ठ्या लिव्ह इनमध्ये राहत होता...
पतीपासून तीन मुलांना जन्म दिला, नंतर आपल्या वयापेक्षा पाच वर्षांनी लहान असलेल्या तरुणासोबत प्रेमसंबंध ठेवले. पतीला धोका दिला म्हणून पतीने सोडले. तर गावकऱ्यांनी त्या तरुणाला पकडून तिच्यासोबत लग्न लावून दिले. बिहारच्या भागलपूरची ही विवाहबाह्य संबंधांची स्टोरी सगळीकडे चर्चेत आली आहे.
खरेतर या तरुणाला म्हणजेच तीन मुलांच्या आईच्या प्रियकराला तिच्यासोबत मौजमस्ती करायची होती. पतीला जेव्हा आपल्या पत्नीचे लफडे असल्याचे समजले तेव्हा त्याने तिला सोडचिठ्ठी दिली. निशाही दिल्लीला राहत होती. तर कुंदन हा भागलपूरला राहत होता. पतीला निशाचे प्रेमसंबंध असल्याचे समजले त्यामुळे त्याने तिला सोडले होते. यामुळे निशा ही कुंदनसोबत भागलपूरला येऊन राहू लागली होती.
निशाला तीन मुले होती, सर्वात मोठा मुलगा हा १७ वर्षांचा होता. हे दोघे एकत्र राहत होते, कुंदनला जेवण-पाणी सगळे मिळत होते. अशातच निशाने कुंदनवर लग्नासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली. यामुळे त्रासून त्याने तिला दिल्लीला सोडले आणि परत भागलपूरला आला. काही दिवसांनी निशा पुन्हा भागलपूरला आली, त्याच्यावर दबाव टाकू लागली. जेव्हा जेव्हा तिने त्याच्यावर दबाव टाकला तेव्हा तेव्हा कुंदन पळून जायचा.
परंतू, बुधवारी रात्री दोघांचे जोरदार भांडण सुरु झाले. कुंदनने तिच्यावर हात उगारला, काही तास हा वाद सुरु होता. यामुळे त्यांना एवढे दिवस असेच राहताना पाहणाऱ्या गावकऱ्यांनी दोघांनाही पकडले आणि मंदिरात नेले. पोलिसांना कळवत दोघांचेही लग्न लावून दिले. यावेळी कुंदन गावकऱ्यांना आपले हिच्याशी लग्न लावू नका, ती तीन मुलांची आई आहे. मी फक्त तिच्यासोबत मजेसाठी राहत होतो. खाणे-पिणे आणि राहणे एवढ्यापुरतेच होते हो, ती माझ्यापेक्षा ५ वर्षांनी मोठी आहे हो, असे सांगत होता. परंतू, गावकऱ्यांनी त्याचे काही ऐकले नाही आणि लग्न लावून दिले आहे.