कुमारस्वामींनी घेतली सोनिया आणि राहुल गांधींची भेट, उपमुख्यमंत्रिपदावर निर्णय उद्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2018 21:33 IST2018-05-21T21:30:12+5:302018-05-21T21:33:39+5:30
जनता दल (सेक्युलर) चे नेते एच. डी. कुमारस्वामी यांनी सोमवारी संध्याकाळी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची भेट घेतली. यावेळी कुमारस्वामी यांनी दोघांनाही कर्नाटकमधील नव्या सरकारच्या शपथविधीसाठी उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले.

कुमारस्वामींनी घेतली सोनिया आणि राहुल गांधींची भेट, उपमुख्यमंत्रिपदावर निर्णय उद्या
नवी दिल्ली - जनता दल (सेक्युलर) चे नेते एच. डी. कुमारस्वामी यांनी सोमवारी संध्याकाळी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची भेट घेतली. यावेळी कुमारस्वामी यांनी दोघांनाही कर्नाटकमधील नव्या सरकारच्या शपथविधीसाठी उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले. या भेटीदरम्यान, कुमारस्वामींनी सोनिया गांधी आणि राहुल गांधीसोबत कर्नाटक सरकारमधील मंत्रिमंडळाबाबत चर्चा केली.
काँग्रेसच्या नेतृत्वाशी झालेल्या चर्चेनंतर कुमारस्वामी यांनी इथे कोणत्याही प्रकारची सौदेबाजी झालेली नाही. आम्ही कर्नाटकमध्ये एकजुटीने काम करू. तसेच राज्यात काँग्रेस आणि जनता दल (सेक्युलर) हे पक्ष एक स्थिर सरकार देतील, असे सांगितले. दरम्यान, नव्या सरकारमधील उपमुख्यमंत्रिपदावर उद्या निर्णय होण्याची शक्यता आहे.
Two-day before his swearing-in ceremony, Karnataka's chief minister-elect #HDKumaraswamy met #UnitedProgressiveAlliance chairperson #SoniaGandhi and Congress Chief #RahulGandhi in New Delhi
— ANI Digital (@ani_digital) May 21, 2018
Read @ANI Story | https://t.co/Kal6T3pBPapic.twitter.com/SBjtG4lelN
कुमारस्वामी आणि काँग्रेसच्या नेतृत्वामध्ये झालेल्या चर्चेपूर्वी दोन्ही पक्षांमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी 30-30 महिन्यांचा करार झाला असून, सुरुवातीचे 30 महिने कुमारस्वामी आणि नंतरच्या काळात काँग्रेसचे नेते मुख्यमंत्री म्हणून काम पाहतील असे वृत्त प्रसारित झाले होते. मात्र कुमारस्वामी यांनी या वृत्ताचे खंडण केले. तसेच जनता दल सेक्युलर आणि काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी कोणताही करार झाला नसल्याचे स्पष्ट केले.