बंगळुरू : कर्नाटकमध्ये कुमारस्वामींनी बहुमत चाचणी घेण्याआधीच हार पत्करल्याचे संकेत दिले असून भाजपाला सत्तास्थापनेचे निमंत्रण दिले आहे. अशा प्रकारे कर्नाटकातील राजकीय नाट्याचा दुसरा अध्यायही संपला आहे.
मुख्यमंत्री कुमारस्वामी म्हणाले, की आमचे सरकार 14 महिन्यांनंतर अंतिम पायरीवर पोहोचले आहे. जेडीएस-काँग्रेसचे सरकार बनल्यापासूनच ते पाडण्यासाठी वातावरण बनविण्यात आले. मी कोणासमोर हात जोडणार नाही मात्र देवाला आजही हात जोडून विचारेन की अशा परिस्थितीमध्ये मला मुख्यमंत्री का बनविले. मी कधीही सत्तेचा दुरुपयोग केला नाही. भाजपा, चला चर्चा करूया. तुम्ही आताही सरकार बनवू शकता. बहुमताचा आकडा असेल तर घाई कशाला. तुम्ही सोमवारी किंवा मंगळवारीही सरकार बनवू शकता. मी सत्तेचा दुरुपयोग करणार नाही.