शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

कोलकाता बलात्कार प्रकरणावरून कुमार विश्वास यांचा जया बच्चन, महुआ मोइत्रा यांच्यावर निशाणा, काय म्हणाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2024 16:51 IST

विश्वास यांनी एका पॉडकास्टमध्ये महुआ मोईत्रा आणि जया बच्चन यांच्यावर निशाणा साधला...

कोलकात्यातील आरजी कर रुग्णालयात ज्युनियर डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणावरून प्रसिद्ध कवी कुमार विश्वास यांनी भाष्य केले आहे. त्यांनी एका पॉडकास्टमध्ये महुआ मोईत्रा आणि जया बच्चन यांच्यावर याप्रकरणी मौन बाळगल्याबद्दल निशाणा साधला. मात्र, कुमार यांनी कुणाचेही नाव घेतले नाही.

यूट्यूबर शुभंकर मिश्रासोबत बोलताना कुमार विश्वास म्हणाले, या घटनेवर बंगालचा आवाज आज शांत आहे. खरे तर, येथे कुमार विश्वास यांचा इशारा टीएमसी खासदार महुआ मोईत्रा यांच्याकडे होता. कोलकाता बलात्कार प्रकरणी त्यांनी मौन बाळगल्याने विश्वास यांनी त्यांच्यावर निशाणा साधला.

जया बच्चन यांच्यावरही भडकले - समाजवादी पक्षाच्या राज्यसभेच्या खासदार जया बच्चन यांच्या संदर्भात बोलताना कुमार विश्वास म्हणाले, आपल्या नावात पतीचे नाव येऊ नये, असे म्हणणारा विजयी आवाज आज शांत आहे. या पक्षाच्या महिला आहेत, ज्या महिला नाही, तर पक्षाचे हीत डोळ्यासमोर ठेऊन संसदेत बोलतात. कुमार विश्वास यांचा इशारा जया बच्चन यांच्याकडे होता. 

मुख्यमंत्री ममता निशाण्यावर - कोलकात्यातील रुग्णालयात घडलेल्या या घटनेनंतर, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) निशाण्यावर आहे. ममता बॅनर्जी सत्य लपवत असल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे. शनिवारी भाजप नेते संबित पात्रा यांनीही ममता बॅनर्जींवर निशाणा साधत, त्या काहीतरी लपवत असल्याचे म्हटले होते.

काय म्हणाले होते संबित पात्रा? - संबित पात्रा म्हणाले, 'एका राज्याचा मुख्यमंत्री त्याच्याच राज्यात घडलेल्या बलात्काराच्या घटनेनंतर रस्त्यावर उतरल्याचे पहिल्यांदाच बघितले. ममता बॅनर्जी रस्त्यावर उतरून लोकांना संभ्रमित करत आहेत. मात्र, जनता जनार्दनाने ममता बॅनर्जी यांचे सत्य जाणले आहे. यापूर्वीही भाजपच्या अनेक नेत्यांनी या घटनेवरून मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर निशाणा साधला आहे.

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालJaya Bachchanजया बच्चनMahua Moitraमहुआ मोईत्राSexual abuseलैंगिक शोषण