शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
8
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
9
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
10
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
11
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
12
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
13
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
14
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
15
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
16
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
17
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
18
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

‘आप’च्या यशानंतर कुमार विश्वास यांना नेटकऱ्यांनी धुतले!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2020 4:44 AM

एकेकाळी कुमार विश्वास हे अरविंद केजरीवालाचे अत्यंत विश्वासु होते. केजरीवालांबरोबर मतभेद झाल्याने 'आप'मधून ते बाहेर पडले.

प्राजक्ता ढेकळे।लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीत ६२ जांगावर विजय मिळवल्याने 'आप'वर सोशल मीडियावरून शुभेच्छांचा वर्षाव झाला. मात्र, प्रारंभी केजरीवालांसोबत काम केलेल्या कवी कुमार विश्वास यांच्यावर मात्र नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर सोलून काढले. अनेक नेटकºयांनी कुमार यांची व्यंगांद्वारे खिल्ली उडवली. भाजपभक्त व काँग्रेस नेते यांच्याबरोबरच नेटकºयांनी कुमार विश्वासवरही मीम्स बनवल्याचे दिसून आले.

एकेकाळी कुमार विश्वास हे अरविंद केजरीवालाचे अत्यंत विश्वासु होते. केजरीवालांबरोबर मतभेद झाल्याने 'आप'मधून ते बाहेर पडले. त्यानंतर सातत्याने कुमार विश्वास सतत आप व केजरीवाल यांच्यावर टीका करत राहिले. विश्वास यांनी केजरीवालांना 'स्वमग्न बुटका' असेही म्हणूनही हिणवलं होते. विधानसभा निवडणूक प्रचारावेळीही त्यांनी आपच्या विरोधात उघड भूमिका घेऊ न टीकेची झोड उठवली होती.

मतदानाच्या दिवशी 'मागील पाच वर्षाचा कलंक धुवून काढण्याची वेळ दिल्लीकरांना आली आहे. मतदानद्वारे समाज, देश, आशा, सेना, मित्रत्व व विश्वासाचा खून करणाºया राजकीय एड्स आत्ममुग्ध बुटक्याचे निकृष्ट मनसुबे उद्ध्वस्त करण्याची वेळ आली आहे. घरातून हाकलून काढून द्या आणि सांगा की अंहकारी शिशुपालांही आम्ही संपवू शकतो, असे ट्विट करून कुमार विश्वास यांनी केजरीवालांना लक्ष्य केले होते.आता बरनॉल मागवा!मात्र 'आप' च्या विजयानंतर नेटकºयांनी मीम्सद्वारे कुमार विश्वास यांना धुवून काढले.एका युजरने जळाल्यानंतर जखमेवर लावयाच्या 'बरनॉल क्रीम' चा फोटो टाकून, कुमार विश्वास यांना ते मागवण्याचा सल्ला दिला.चित्रपटातील संवाद, गाण्याद्वारे मीम्स करत अरविंद केजरीवाल व कुमार विश्वास यांचे फोटोही पोस्ट केले आहेत.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालdelhi electionदिल्ली निवडणूकAAPआप