CoronaVirus News: लष्करातही कोरोनाचा शिरकाव; काश्मीरमध्ये CRPFचे 31 जवान संक्रमित
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2020 15:25 IST2020-06-13T15:13:00+5:302020-06-13T15:25:25+5:30
जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये तैनात सीआरपीएफच्या 90 बटालियनमध्ये 300हून अधिक सैनिकांची कोरोना टेस्ट करण्यात आली होती. यात 31 जवानांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळले.

CoronaVirus News: लष्करातही कोरोनाचा शिरकाव; काश्मीरमध्ये CRPFचे 31 जवान संक्रमित
नवी दिल्लीः देशात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात फैलाव झाला असून, रुग्णसंख्याही वाढत आहे. कोरोनाला थोपवण्यासाठी सरकार आपल्या पातळीवर प्रयत्नशील आहे. तरीही रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. आता सुरक्षा कर्मचारीही कोरोना विषाणूच्या विळख्यात सापडत आहेत. जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) 31 जवानांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये तैनात सीआरपीएफच्या 90 बटालियनमध्ये 300हून अधिक सैनिकांची कोरोना टेस्ट करण्यात आली होती. यात 31 जवानांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळले.
केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या संपूर्ण कंपनीची कोरोना टेस्ट करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. कुलगाममध्ये तैनात सीआरपीएफ जवानांमध्ये इतका मोठा प्रमाणात कोरोनाचं संक्रमण झाल्यानं भीतीचं वातावरण पसरलं आहे. विशेष म्हणजे सध्या या भागात अतिरेकी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमकी सुरू आहेत. सीआरपीएफच्या 90 बटालियनचे जवान अशा चकमकीत सक्रिय भाग घेतात. परंतु कोरोना प्रकरण उघडकीस आल्यानंतर 18व्या बटालियनचे जवान दहशतवाद्यांविरुद्धच्या संयुक्त कारवाईत सामील झाले आहेत. विशेष म्हणजे जम्मू-काश्मीरच्या पुलवामा आणि कुलगाम येथे शनिवारी सुरक्षा दले आणि अतिरेक्यांमध्ये चकमकी झाल्या. यावेळी सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. कुलगाम जिल्ह्यातील निपोरा भागात घेराव आणि शोधमोहिमेदरम्यान सुरक्षा दले आणि अतिरेक्यांमध्ये गोळीबार सुरू झाला. या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले.
देशात कोरोना संक्रमणाची संख्या वाढून 3,08,993 झाली आहे. त्याचबरोबर मृतांचा आकडा 8,884 वर पोहोचला आहे. आतापर्यंत 1,54,330 लोक बरे झाले असून, घरी परत गेले आहेत. 1,45,779 कोरोना रुग्णांवर अद्याप उपचार चालू आहेत. गेल्या 24 तासांत कोरोनाची 11,458 नवीन नोंद झाली आहे. तर 6 386 लोकांचा मृत्यू झाला आहे.
हेही वाचा
CoronaVirus : धोका वाढला! चीनमध्ये कोरोनाची 'दुसरी' लाट; बीजिंगमध्ये लॉकडाऊन
CoronaVirus News: दिल्लीत कोरोनानं हाहाकार; स्मशानात मृतदेहांसाठी जागाच नाही