CoronaVirus News: दिल्लीत कोरोनानं हाहाकार; स्मशानात मृतदेहांसाठी जागाच नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2020 01:23 PM2020-06-13T13:23:14+5:302020-06-13T13:24:22+5:30

CoronaVirus News: वर्षानुवर्षे निगमबोध घाट येथे अंत्यसंस्कार करणाऱ्या पंडितांच्या मते, कोरोना कालावधीत त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

CoronaVirus News: delhi coronavirus covid 19 death cremation ground last rituals | CoronaVirus News: दिल्लीत कोरोनानं हाहाकार; स्मशानात मृतदेहांसाठी जागाच नाही

CoronaVirus News: दिल्लीत कोरोनानं हाहाकार; स्मशानात मृतदेहांसाठी जागाच नाही

Next

नवी दिल्लीः राजधानीत कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. संसर्ग झालेल्या रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. दिल्लीत कोरोनाचा मोठा फैलाव झाल्यानं स्मशानात मृतांचा खच पडलेला पाहायला मिळतोय. त्यामुळे मृतदेहांवर अंतिम संस्कार करणारे पंडित अन् स्मशानातील कर्मचारीही वैतागलेले आहेत. वर्षानुवर्षे निगमबोध घाट येथे अंत्यसंस्कार करणाऱ्या पंडितांच्या मते, कोरोना कालावधीत त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

गेल्या 15 दिवसांपासून स्मशानातील आचार्य आणि त्यांच्या निगमबोध यांच्या पथकाद्वारे दररोज 40 ते 50 मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. आता ते लोकही कंटाळलेले आहेत. मृतदेहांचा आकडा सतत वाढत असल्यानं ते देखील अस्वस्थ झाले आहेत. ते म्हणतात की, जेव्हा कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या लोकांचे मृतदेह येऊ लागले, तेव्हा सरकारने आणखी 4 स्मशानभूमी तयार करण्यास सुरुवात केली. निगमबोध घाटातील सध्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी 48 प्लॅटफॉर्म आहेत, पण तेसुद्धा कमी पडत आहेत. त्यामुळे नदीकाठी आणखीन 25 जागांवर नवे प्लॅटफॉर्म तयार करण्यात येत आहेत. 

स्मशानभूमीत जागेची कमतरता
देशाची राजधानी दिल्लीत एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या 34,000च्या वर गेली आहे, तर दुसरीकडे मृत्यूची संख्याही दररोज वाढत आहे. स्मशानभूमीत मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा कमी पडत आहे, अशी परिस्थिती आहे. त्यामुळेच पहिल्यांदा दोन स्मशानभूमी असलेल्या दिल्लीत आता 4 स्मशानभूमी करण्यात आल्या आहेत. सर्व कोरोना रुग्णांच्या मृतदेहांच्या अंत्यसंस्कारासाठी ५ ते ६ तास लागतात. 

निगमबोध घाटावर कमी जागा
निगमबोध घाटात लोकांच्या अंत्यसंस्कारांसाठी जवळपास 100 प्लॅटफॉर्म आहेत, त्यापैकी 48 प्लॅटफॉर्मवर कोरोना रुग्णांवर अंतिम संस्कार करण्यात येत आहेत. हे सर्व प्लॅटफॉर्म पूर्णपणे भरले आहेत. एकामागून एक शव रुग्णवाहिकांमध्ये आणले जात आहेत आणि त्यांचे अंतिम संस्कार केले जात आहेत.

रुग्णालयांवर दुर्लक्ष केल्याचा आरोप
मोनिकाने आपल्या वडिलांना भरलेल्या डोळ्यांनी निरोप दिला आणि तिच्या वडिलांना दिल्लीच्या एलएनजेपी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयाच्या दुर्लक्षामुळे तिच्या वडिलांचा मृत्यू झाल्याचा आरोप मोनिकाने केला आहे. सकाळी ती वडिलांचा मृतदेह घेण्यासाठी रुग्णालयात पोहोचली तेव्हा रुग्णालयातून दुसर्‍या व्यक्तीचा मृतदेह तिच्या हातात देण्यात आला. मोनिकाला अजूनही अडचणींचा सामना करावा लागला आहे. जेव्हा निगमबोध घाटावर वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी पोहोचली तेव्हा तेथेही तिला 4 ते 5 तास थांबावे लागले. अशीच काहीशी परिस्थिती दिल्लीतल्या पंजाबी बाग स्मशानभूमीच्या बाबतीतही आहे. या घाटात 4 सीएनजी आणि 71 लाकूडांवर मृतदेह जाळण्याची व्यवस्था आहेत. मैदानाच्या सर्व प्लॅटफॉर्मवर एकाच वेळी बरेच मृतदेह जाळले जात आहेत. ते खरंच भयानक आहे. 
 

Web Title: CoronaVirus News: delhi coronavirus covid 19 death cremation ground last rituals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.