कोविड-१९ रुग्ण मृत्यू दर एक टक्क्याच्या खाली आणा -अमित शहा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2020 05:43 AM2020-11-25T05:43:38+5:302020-11-25T05:44:02+5:30

शहा यांनी मुख्यमंत्र्यांना कंटेनमेंट झोन्स अधिक सक्षम करण्याचे पाऊल उचलण्यास सांगितले. अधिकाऱ्यांनी जी माहिती गोळा करण्यात आली त्या आधारे दर आठवड्याला रेड झोन्सला भेट द्यावी

Kovid-19 Bring patient mortality rate below one per cent - Amit Shah | कोविड-१९ रुग्ण मृत्यू दर एक टक्क्याच्या खाली आणा -अमित शहा

कोविड-१९ रुग्ण मृत्यू दर एक टक्क्याच्या खाली आणा -अमित शहा

Next

कोविड-१९ रुग्ण मृत्युचा दर हा एक टक्क्याच्या खाली असावा आणि नवे रुग्ण होण्याचे प्रमाण पाच टक्क्यांच्या वर नसावे यासाठी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी प्रयत्न करावेत, अशी सूचना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी केली. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व मुख्यमंत्री आणि केंद्रशासित प्रदेशांची व्हर्च्युअल बैठक घेतली. त्यात शहा यांनी ही सूचना केली.

शहा यांनी मुख्यमंत्र्यांना कंटेनमेंट झोन्स अधिक सक्षम करण्याचे पाऊल उचलण्यास सांगितले. अधिकाऱ्यांनी जी माहिती गोळा करण्यात आली त्या आधारे दर आठवड्याला रेड झोन्सला भेट द्यावी, विशिष्ट भागाचा दर्जा बदलावा, असे सांगितले. सध्या दर १५ दिवसांनी कंटेनमेंट झोन्समधील माहिती गोळा केली जात आहे. शहा म्हणाले की, सर्व तीनही लक्ष्ये लवकरात लवकर गाठली जातील यासाठी मुख्यमंत्र्यांनी सर्व प्रयत्न करावेत.

फायझरच्या लसीची गरज पडणार नाही- डॉ. हर्षवर्धन

n    कोरोना विषाणूला रोखण्यासाठी देशात इतर लसींच्या घेतल्या जात असलेल्या चाचण्यांचे निष्कर्ष आश्वासक असल्यामुळे भारताला फायझरच्या लसीची कदाचित गरज पडणार नाही, असा पुनरुच्चार केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी केला.
n    डॉ. हर्षवर्धन म्हणाले, फायझर-बायोटेकच्या लसीला अमेरिकेच्या नियामक प्राधिकरणनेही अजून मान्यता दिलेली नसल्यामुळे तिचा विचार करण्याचे काही कारणच नाही.

n    समजा अमेरिकेची त्या लसीला मान्यता मिळाली तरी तिची उत्पादक कंपनी इतर देशांना ती पुरवण्याच्या आधी लोकांना ती उपलब्ध करून देईल.
n    सध्या भारतात कोविड-१९ वर उपाय म्हणून किमान पाच लसींच्या मानवावर चाचण्या केल्या जात असून त्यापैकी तीन लसी या सुरक्षितता आणि सामर्थ्य सिद्ध करणाऱ्या दोन-तीन क्लिनिकल चाचण्यांच्या पायऱ्यांवर आहेत, असेही ते म्हणाले. 
 

Web Title: Kovid-19 Bring patient mortality rate below one per cent - Amit Shah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.