अरे देवा! ना वीज, ना मोबाईल नेटवर्क... 'या' गावातील मुलांचं ठरत नाही लग्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 16:48 IST2025-01-28T16:46:05+5:302025-01-28T16:48:44+5:30
आजही हे गाव वीज आणि मोबाईल नेटवर्कसारख्या मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याने येथे मुलांचं लग्नच ठरत नाही.

फोटो - ndtv.in
आजकाल देशभरात लग्नाची धामधूम आहे. शेकडो तरुण-तरुणी लग्नाच्या बेडीत अडकत आहेत. गाव असो वा शहर, लग्नाची गाणी सर्वत्र वाजत आहे पण राजस्थानातील कोटा येथील कोलीपुरा गाव असं आहे जिथे लोक लग्नाच्या आनंदापासून वंचित राहतात. आजही हे गाव वीज आणि मोबाईल नेटवर्कसारख्या मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याने येथे मुलांचं लग्नच ठरत नाही.
कोलीपुरा गाव मुकुंदरा व्याघ्र प्रकल्पात येतं. यामुळे, ग्रामस्थ त्यांच्या इच्छेनुसार येथे मूलभूत सुविधा विकसित करू शकत नाहीत आणि वन्यजीव विभाग त्यांना येथे कोणत्याही प्रकारचे विकासकाम करण्याची परवानगी देत नाही. मोठी गोष्ट म्हणजे स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षांनंतरही या गावात वीज पोहोचलेली नाही आणि येथे मोबाईल नेटवर्कही नाही.
मुलीचे कुटुंबीय नकार देतात आणि म्हणतात की वीज आणि मोबाईल नेटवर्क नसलेल्या गावात आमची मुलगी कशी जगू शकेल? या गावातील लोक म्हणतात की, मुलांची लग्नही होत नाहीत आणि कोणीही नातेवाईक आम्हाला भेटायला येत नाही कारण आज वीज आणि मोबाईल नेटवर्क हे जीवनाचा एक मोठा भाग बनले आहेत.
मुकुंदरा व्याघ्र प्रकल्पात असलेल्या कोलीपुरा गावात ५०० हून अधिक घरं आहेत. इथे प्रत्येकाकडे फोन आहे पण रिंग फक्त एकाच व्यक्तीच्या मोबाईलवर वाजते आणि नेटवर्कची व्यवस्था करण्यासाठी फार जुगाड करावा लागतो. या डिजिटल युगात, मुलांच्या शिक्षण ते तरुणांचं लग्न या अनेक गोष्टींमध्ये अडचणी येत आहेत.