शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

"मी विद्यार्थ्यांविरोधात..."; बंगाल प्रोटेस्टसंदर्भातील वक्तव्यावर CM ममता यांचं स्पष्टिकरण, काय म्हणाल्या?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2024 14:49 IST

ममता बॅनर्जी विद्यार्थ्यांना घाबरवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे...

कोलकात्यातील आरजी कर मेडिकल महाविद्यालयात झालेल्या ट्रेनी डॉक्टरवरील अत्याचार आणि हत्येप्रकरणी, न्यायाची मागणी करत सरकारी रुग्णालयातील डॉक्टर आंदोलन करत आहेत. त्यांच्या या आंदोलनासंदर्भात बोलताना, एक एफआयआर त्यांचे भविष्य उध्वस्त करू शकते, असे CM ममता बॅनर्जी यांनी म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर, विरोधकांनी ममतांना निशाण्यावर घेतले आहे. ममता बॅनर्जी विद्यार्थ्यांना घाबरवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. यानंतर आता, ममता बॅनर्जी यांनी आपल्या वक्तव्यावर स्पष्टिकरण दिले आहे.

आता काय म्हणाल्या ममता -आपल्या भाषणासंदर्भात स्पष्टीकरण देताना, ममता यांनी सोशल मीडियावर लिहिले, "मला काही प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल माध्यमांमध्ये दुर्भावनापूर्ण प्रचाराची माहिती मिळाली, जे काल मी विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमात दिलेल्या भाषणासंदर्भात पसरवले गेले. मी स्पष्टपणे सांगू इच्छिते की, मी (वैद्यकीय इ.) विद्यार्थ्यांच्या अथवा त्यांच्या आंदोलनाविरुद्ध एक शब्दही बोललेले नाही. त्यांच्या आंदोलनाला माझा पूर्ण पाठिंबा आहे. त्याचे आंदोलन सत्य आहे. काही लोक माझ्यावर आरोप करत आहेत त्याप्रमाणे मी त्यांना कधीही धमकी दिली नाही. हा आरोप पूर्णपणे चुकीचा आहे."

त्या पुढे म्हणाल्या, "मी भाजप विरोधात बोलले आहे. मी त्यांच्या विरोधात बोलले, कारण ते केंद्र सरकारच्या मदतीने आमच्या राज्यातील लोकशाही धोक्यात आणत आहेत. ते राज्यात अराजक निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या विरोधात मी भाष्य केले आहे."

"मी हेही स्पष्ट करू इच्छिते की, मी काल माझ्या भाषणात जी वापरली, ती श्री रामकृष्ण परमहंस देव यांची ओळ आहे. ते म्हणाले होते, कधी कधी आवाज उठवावा लागतो. गुन्हे, गुन्हेगारी घटना घडतात तेव्हा विरोधी आवाज बुलंद करावाच लागतो. मी त्याच संदर्भात विधान केले होते," असेही ममता म्हणाल्या. 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगालStudentविद्यार्थीTrinamool Congressतृणमूल काँग्रेसBJPभाजपा