शहरं
Join us  
Trending Stories
1
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
2
"कमी जागा मिळो अथवा जास्त, मुख्यमंत्री नितीश कुमारच होणार", जदयूचा भाजपला स्पष्ट मेसेज, एनडीएमध्ये पेच
3
पाकिस्तान समर्थक जमात ए इस्लामीने बांगलादेशात दाखवली ताकद; देशात इस्लामिक राजवटीचे संकेत?
4
तेल ते टेलिकॉमपर्यंत... उद्योगपती मुकेश अंबानींचं साम्राज्य किती मोठं? इतक्या कंपनीचे आहेत मालक
5
महाराष्ट्रातील ४-५ मंत्र्यांना मिळणार डच्चू?; संजय राऊतांचा दावा, एका मंत्र्याचं नावही सांगितले
6
लँडिंगची तयारी अन् अचानक उड्डाण; दोन विमानांच्या २५ मिनिटे आकाशात! इंडिगोच्या विमानांमध्ये प्रवाशांचा थरकाप
7
शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित, कृषीमंत्री ‘रमी’ खेळण्यात मग्न; रोहित पवारांनी व्हिडिओच दाखवला
8
"दिवसाला ८ शेतकरी आत्महत्या अन् कृषिमंत्री विधानसभेत बसून रमी खेळतायेत, लाज वाटत नाही का?"
9
'स्लीपिंग प्रिन्स'ची २० वर्षांची लढाई संपली! वडिलांनी लाईफ सपोर्ट काढण्यास दिला होता नकार!
10
ओडिशात नराधमांनी किशोरवयीन मुलीला पेटवले, ७० टक्के भाजल्याने प्रकृती गंभीर
11
Live in Partner Murder: 'एएसआय' लिव्ह पार्टनरची हत्या, ज्या पोलीस ठाण्यात होती सेवेत तिथेच गेला शरण
12
भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले...
13
विधानसभा विरोधी पक्षनेतेपद रिकामेच, आता नागपूर अधिवेशनापर्यंत प्रतीक्षा!
14
ठाकरे बंधू एकत्रच, कुणाला काय प्रॉब्लेम?, मी आणि राज एकत्र आल्यानं..."; उद्धव ठाकरे कडाडले
15
सभागृहाबाहेरच्या कारनाम्यांनी सरकारची अधिवेशनातील कामगिरी झाकोळली!
16
महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या निवडणुकीत 'सहकार पॅनेल'ची आघाडी: २१ पैकी ९ उमेदवार बिनविरोध
17
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘भक्तशिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार’ जाहीर
18
भारताची ताकद जग बघेल! शुभांशू शुक्लांच्या अनुभवातून गगनयानला बळ, स्वदेशी मोहिमेची तयारी
19
यूट्यूबवरून आयडिया मिळाली; क्यूआर कोड बदलून दुकानदारांची फसवणूक केली
20
ड्रग्ज विक्रीसाठी आलेले सहा जण अटकेत, ५४ लाख ४६ हजार रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त

"अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अर्थ दुसऱ्याचा धार्मिक भावना दुखावणे नाही"; कोर्टाने फेटाळला शर्मिष्ठा पनोलीचा जामीन अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 15:15 IST

ऑपरेशन सिंदूरनंतर एका विशिष्ट धर्मावर टिप्पणी केल्याचा आरोप असलेल्या शर्मिष्ठा पनोलीचा जामीन कोर्टाने फेटाळला आहे.

Sharmistha Panoli: ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडिया पोस्टद्वारे धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या इंस्टाग्राम इन्फ्लुएंसरला दिलासा देण्यास कोलकाता कोर्टाने नकार दिला आहे. कोलकाता येथील अलीपूर न्यायालयाने कायद्याची विद्यार्थिनी असलेल्या २२ वर्षीय शर्मिष्ठा पनोलीचा जामीन नाकारत १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.  ऑपरेशन सिंदूरनंतर बॉलिवूड कलाकारांनी बाळगलेल्या मौनावर तिने एक व्हिडिओ पोस्ट केला होता. त्यानंतर हरियाणाच्या गुरुग्राम येथून कोलकाता पोलिसांनी तिला अटक केली होती. अभिव्यक्ती स्वातंत्र्य धार्मिक भावना दुखावण्याची परवानगी देत ​​नाही, अशी टिप्पणीही यावेळी कोर्टाने केली.

कोलकता हायकोर्टाने मंगळवारी सोशल मिडिया इन्फ्लुएंसर आणि कायद्याची विद्यार्थिनी शर्मिष्ठा पनोलीला अंतरिम जामीन देण्यास नकार दिला. व्हायरल व्हिडिओबद्दल टीका झाल्यानंतर, पनोलीने तो व्हिडिओ काढून टाकला आणि एक्सवरुन माफी मागितली होती. मात्र औपचारिक तक्रार दाखल झाल्यानंतर, तिला गुरुग्राममध्ये अटक करण्यात आली आणि ट्रान्झिट रिमांडवर कोलकाता येथे आणण्यात आले होते. त्यानंतर जामीन अर्जावर सुनावणी करताना कोर्टाने शर्मिष्ठाला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

"या सगळ्या प्रकारामुळे आपल्या देशातील काही लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही इतरांच्या भावना दुखावू शकाल. आपला देश विविधतेने भरलेला आहे," असं कोलकाता हायकोर्टाने म्हटलं.

पुण्यातील सिम्बायोसिस लॉ स्कूलची विद्यार्थिनी असलेल्या शर्मिष्ठा पनोलीला ३० मे रोजी गुरुग्राममध्ये अटक करण्यात आली होती. एफआयआरमध्ये तिच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता. कोणतीही पूर्वसूचना न देता तिला अटक करण्यात आली. त्यामुळे तिची अटक बेकायदेशीर असल्याचा युक्तिवाद पानोलीच्या वकिलांनी केला. तर पोलिसांनी नोटीस बजावण्यात आली होती पण पनोली आणि तिचे कुटुंबिय गुरुग्रामला पळून गेले असा युक्तिवाद केला. हायकोर्टाने पनोलीचा जामीन नाकारता म्हटलं की कोलकातामध्ये दाखल झालेला प्राथमिक गुन्हा हा मुख्य खटला मानला जाईल, कारण तो आधी दाखल करण्यात आला होता.

दरम्यान, शर्मिष्ठा पनोलीने ऑपरेशन सिंदूर प्रकरणावर जातीयवादी टिप्पणी पोस्ट केल्याचा आरोप आहे. शर्मिष्ठाने अपलोड केलेल्या व्हिडिओनंतर तिला धमक्या मिळू लागल्या होत्या. वाद वाढलेला पाहून शर्मिष्ठा पनोलीने व्हिडिओ डिलिट करत त्यावरून माफीही मागितली. मात्र तरीही शर्मिष्ठा पनोली हिला अटक करण्यात आली. पनोलीवर वेगवेगळ्या समुदायांमध्ये शत्रुत्व वाढवणे, धार्मिक भावना दुखावण्याच्या उद्देशाने कृत्ये करणे, जाणूनबुजून अपमान करणे, शांतता भंग करण्यासाठी चिथावणी देणे यासह इतर संबंधित कलमांखाली विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरHigh Courtउच्च न्यायालयwest bengalपश्चिम बंगाल