शहरं
Join us  
Trending Stories
1
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
2
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
3
देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
4
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा 'इतका' दर लावला
5
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
6
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
7
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
8
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
9
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
10
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
11
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
12
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
13
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
14
पक्षश्रेष्ठींच्या आदेशामुळे १८ मंडल, प्रांत अध्यक्ष नाराज; शिंदेसेनेसोबत युती नको, स्वबळावर लढू द्या
15
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
16
ऐन निवडणुकीच्या तोंडावर मराठी शाळा मुद्दा ऐरणीवर, मराठी अभ्यास केंद्राचा मोर्चा; निवडणुकीनंतर चर्चा होणार
17
दगडातून इतिहास साकारणारे शिल्पकार राम सुतार कालवश; वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
18
खासगी विमान व्यवसाय महाराष्ट्रातून जाणार? पार्किंग, विमान उतरण्यासाठीचे स्लॉट मिळणे कठीण होत असल्याची भावना
19
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
20
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
Daily Top 2Weekly Top 5

जाणून घ्या, कर्नाटक विधानसभेतील 'हा' आकड्यांचा खेळ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2019 10:48 IST

मुख्यमंत्री कुमारस्वामी यांची सरकार वाचविण्यासाठी धडपड सुरु आहे.

बंगळुरु - कर्नाटकात सध्या घडणाऱ्या राजकीय नाट्यामुळे संपूर्ण देशाचं लक्ष कर्नाटकवर लागून राहिलं आहे. आज मुख्यमंत्री कुमारस्वामी यांची अग्निपरीक्षा आहे. कर्नाटक विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी काँग्रेस-जेडीएसला प्रयत्न करावे लागणार आहेत. बहुमत सिद्ध केलं नाही तर कर्नाटकातील सरकार कोसळण्याची शक्यता आहे. 225 विधानसभा सदस्य संख्या असलेल्या कर्नाटक विधानसभेत बहुमतासाठी 113 मतांची गरज आहे. परंतु 15 आमदारांच्या बंडखोरीमुळे हे सगळं चित्र पालटलं आहे.

15 आमदारांच्या बंडखोरीमुळे कर्नाटकात बहुमत सिद्ध करण्यासाठी 106 मतांची गरज आहे. कर्नाटक विधानसभेतील हा आकड्यांचा खेळ कसा आहे ते आपण पाहूया 

असा असेल आकड्यांचा खेळ

  • 225 - कर्नाटक विधानसभेतीला ही आहे एकूण सदस्यसंख्या, 224 लोकांमधून निवडून आलेले सदस्य तर उर्वरित 1 सदस्य स्वीकृत असतो. 
  • 210 - जर बंडखोर 15 आमदार सभागृहात गैरहजर राहिले तर एकूण संख्याबळ होईल 210, काँग्रेसचे बंडखोर आमदार रामलिंगा रेड्डी यांनी त्यांचा राजीनामा परत घेतला आहे. रेड्डी यांनी सरकारला मतदान करणार असल्याचं सांगितले आहे. 
  • 106 - जर 15 आमदारांनी मतदानात सहभाग घेतला नाही तर बहुमतासाठी लागणारी मॅजिक फिगर साठी हे संख्याबळ लागेल. 
  • 105 - भाजपाकडे एकूण 105 आमदार आहेत. त्यात बंडखोर आमदारांनी मतदानात सहभाग घेतला नाही तर त्यांना कुमारस्वामी सरकार पाडण्यासाठी 1 मताची गरज लागेल. दोन अपक्ष आमदारांनी याआधीच भाजपाला पाठिंबा दिला आहे. 

  • 102 - काँग्रेस आणि जेडीएस यांच्या आमदारांची संख्या, स्पीकर आणि स्वीकृत आमदारांना मिळून आघाडी सरकारला 102 आमदारांचे पाठबळ आहे. मात्र समसमान मतदान झालं तर विधानसभा अध्यक्षांना मत देण्याची संधी मिळेल. 
  • 3 - इतर आणि अपक्ष आमदार, दोन अपक्ष आमदारांनी भाजपाला पाठिंबा दिला आहे. फक्त बसपाचे एकमेव आमदार एन महेश कोणाला पाठिंबा देतील यावर अजून तरी सस्पेन्स आहे. 
  • 6 - काँग्रेस-जेडीएस सरकार वाचविण्यासाठी कमीत कमी 6 बंडखोर आमदारांना आपल्या बाजूने वळविणे गरजेचे आहे. जर एक बंडखोर अयोग्य घोषित केला गेला. बसपा आमदाराने आघाडी सरकारच्या बाजूने मतदान केले तर कुमारस्वामी यांना सरकार वाचविण्यासाठी चार बंडखोर आमदारांची गरज लागणार आहे.  
टॅग्स :Karnatak Politicsकर्नाटक राजकारणKarnatakकर्नाटकcongressकाँग्रेसBJPभाजपा