गावी जाताय, तिकीट कन्फर्म नाही, चिंता सोडा; रेल्वेच्या ‘या’ सुविधेमुळं कन्फर्म जागा मिळण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2021 16:45 IST2021-11-01T16:41:15+5:302021-11-01T16:45:33+5:30

ही सुविधा म्हणजे पर्याय स्कीम आहे. रेल्वे खूप काळापासून हा पर्याय चालू आहे. मोठ्या संख्येने या पर्यायाचा फायदा होऊ शकतो.

Know About Indian Railway opation terms for confirm railway ticket when travel | गावी जाताय, तिकीट कन्फर्म नाही, चिंता सोडा; रेल्वेच्या ‘या’ सुविधेमुळं कन्फर्म जागा मिळण्याची शक्यता

गावी जाताय, तिकीट कन्फर्म नाही, चिंता सोडा; रेल्वेच्या ‘या’ सुविधेमुळं कन्फर्म जागा मिळण्याची शक्यता

नवी दिल्ली – देशभरात दिवाळीसह अन्य सणानिमित्त मोठ्या संख्येने लोकं गावाकडे जातात. ज्यासाठी सर्वात जास्त ट्रेनने प्रवास करतात. भारतीय रेल्वे प्रवासासाठी तिकीट कन्फर्म होणं खूप जिकरीचं असतं. कारण वेटिंग लिस्टची यादी भलीमोठी असते. त्यामुळे आता भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी एक असा पर्याय दिला आहे. ज्यामुळे रेल्वेचं तिकीट कन्फर्म होण्याची शक्यता जास्त आहे.

ही सुविधा म्हणजे पर्याय स्कीम आहे. रेल्वे खूप काळापासून हा पर्याय चालू आहे. मोठ्या संख्येने या पर्यायाचा फायदा होऊ शकतो. सणाच्या दिवशी गावाला जाण्याचा विचार करत असाल तर हा पर्याय तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. त्यामुळे तिकीट कन्फर्म होण्याची शक्यता जास्त आहे. जर वेटिंग तिकीट त्या ट्रेनमध्ये कन्फर्म होत नसेल तर तुम्ही पर्यायी ट्रेन निवडलं असेल तर त्याच जागा कन्फर्म होऊ शकते. परंतु हे ट्रेन आणि जागेवर अवलंबून आहे.

IRCTC मते, ज्या ट्रेनचं बुकींग केले असेल त्या ट्रेनच्या प्रस्थान करण्यापासून ७२ तासांच्या आत पर्यायी ट्रेनमध्ये तुम्हाला जागा मिळू शकेल. या पर्यायी ट्रेनमध्ये समान श्रेणी लागू असेल. उत्तर रेल्वेने याबाबत काही माहिती ट्विटवरुन दिली आहे. हा पर्याय रेल्वे प्रवाशांसाठी खूप चांगली सुविधा आहे. वेटिंग लिस्टवर असणाऱ्या प्रवाशांसाठी त्याच मार्गावरील अन्य पर्यायी ट्रेनमध्ये जागा मिळण्याच्या दृष्टीने फायदेशीर आहे. जर कुणी या पर्याय स्वीकारतो तेव्हा त्याला जागा मिळण्याची शक्यता अधिक असते. IRCTC च्या वेबसाईटवर याबाबत अधिक माहिती मिळू शकते.

सणांच्यावेळी रेल्वेकडून अतिरिक्त गाड्यांची सोय

उत्सवावेळी विविध रेल्वे स्टेशनवरील प्रवाशांची संख्या लक्षात घेता भारतीय रेल्वेकडून विशेष गाड्या सोडल्या जातात. आता धनत्रयोदशी, दिवाळीसह अन्य सण आले आहेत. त्यावेळी रेल्वेकडून अतिरिक्त गाड्यांची सुविधा करण्यात आली आहे. सणांच्या काळात रेल्वेने लांबचा प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक असते. रेल्वेत कन्फर्म जागा न मिळाल्यानं प्रवासात अनेक अडीअडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे रेल्वेने दिलेल्या या पर्यायाचा वापर केल्यास प्रवाशांना फायदा होण्याची शक्यता असते.

Web Title: Know About Indian Railway opation terms for confirm railway ticket when travel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :railwayरेल्वे