शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2024 19:14 IST

DK Shivakumar : कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी प्रज्वल रेवण्णाचे काका आणि माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

Prajwal Revanna Scandal Case : बंगळुरु : कर्नाटकातील अश्लिल व्हिडीओ प्रकरणात अडकलेल्या प्रज्वल रेवण्णाच्या कुटुंबीयांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. प्रज्वल रेवण्णाचे वडील एचडी रेवण्णा यांना कर्नाटक एसआयटीने अटक केली आहे. दरम्यान, या प्रकरणावरून आता कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी प्रज्वल रेवण्णाचे काका आणि माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

डीके शिवकुमार यांनी व्हिडिओ व्हायरल करणे हे एचडी कुमारस्वामी यांचे षडयंत्र असल्याचे म्हटले आहे. डीके शिवकुमार म्हणाले की, एचडी कुमारस्वामी हे कहाणीचे मुख्य दिग्दर्शक आणि निर्माते होते. ते ब्लॅकमेलिंगचे बादशहा आहेत. तसेच, एचडी कुमारस्वामी यांना पेनड्राइव्हची माहिती होती. लोकांची राजकीय कारकीर्द संपवणे आणि इतरांना ब्लॅकमेल करणे, हे एचडी कुमारस्वामी यांचे काम आहे, असा दावा डीके शिवकुमार यांनी केला आहे. 

हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, एचडी कुमारस्वामी यांना पेन-ड्राइव्हची पूर्ण माहिती होती, असे एका वकील आणि इतर लोक सांगत आहेत, असा आरोप डीके शिवकुमार यांनी केला आहे. तसेच, एचडी कुमारस्वामींना माझा राजीनामा पाहिजे आहे. तर यावरून असे दिसते की, ते वोक्कालिगा नेतृत्वासाठी माझ्याशी स्पर्धा करत आहेत, असेही डीके शिवकुमार म्हणाले.

एचडी कुमारस्वामी यांनी काय केला होता दावा?दरम्यान, जनता दल (सेक्युलर) नेते एचडी कुमारस्वामी यांनी प्रज्वल रेवण्णा प्रकरणावर मोठा दावा केला होता. प्रज्वल रेवण्णाच्या कथित सेक्स स्कँडलशी संबंधित 25,000 पेन ड्राईव्ह निवडणुकीपूर्वी वितरित करण्यात आल्याचे एचडी कुमारस्वामी यांनी सांगितले होते. तसेच, त्यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्यावर आरोप केले होते. ते म्हणाले की, व्हिडिओ असलेला पेन ड्राईव्ह बंगळुरू ग्रामीण लोकसभा मतदारसंघात प्रसिद्ध करण्यात आला होता, जिथून डीके शिवकुमार यांचा भाऊ देखील निवडणूक लढवत आहे.

टॅग्स :Karnatak Politicsकर्नाटक राजकारणKarnatakकर्नाटकkumarswamyकुमारस्वामी