झोपेत असलेल्या एएसआय अधिका-याची गोळ्या घालून हत्या, मुलावर संशय
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2017 17:02 IST2017-09-19T15:05:35+5:302017-09-19T17:02:16+5:30
गुरुग्राममधील डीएलएफ फेज 2 मध्ये राहणा-या एका एएसआय अधिका-याची झोपत असताना गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची घटना मंगळवारी घडली.

झोपेत असलेल्या एएसआय अधिका-याची गोळ्या घालून हत्या, मुलावर संशय
गुरुग्राम, दि. 19 - गुरुग्राममधील डीएलएफ फेज 2 मध्ये राहणा-या एका एएसआय अधिका-याची झोपत असताना गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची घटना मंगळवारी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, डीएलएफ फेज 2 मधील यू ब्लॉकमध्ये राहत्या घरी एएसआय अधिका-याची हत्या करण्यात आली. ही घटना मंगळवारी रात्री तीन वाजताच्या सुमारास घडली. नरेश यादव असे या एएसआय अधिका-याचे नाव असून फरीदाबादमध्ये ते कार्यरत होते. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला असून नरेश यादव यांची हत्या त्यांच्या मुलानेच केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
सुत्रांच्या माहितीनुसार, या हत्येमागचे कारण अवैध संबंध असल्याचे सुद्धा समोर येत आहे. नरेश यादव यांची हत्या करण्यासाठी गावठी पिस्तुल वापरण्यात आले आहे. तसेच, त्यांच्या मुलावर याआधी सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ASI of #Gurugram Police Naresh Yadav shot dead at his residence in DLF Phase 3, Police begin investigation
— ANI (@ANI) September 19, 2017
ASI of #Gurugram Police Naresh Yadav shot dead at his residence in DLF Phase 3, Police begin investigation. pic.twitter.com/krolzdg59N
— ANI (@ANI) September 19, 2017
सविस्तर वृत्त लवकरच...