रेल्वेला धडकून माशे येथे महिला ठार

By Admin | Updated: February 14, 2015 23:51 IST2015-02-14T23:51:34+5:302015-02-14T23:51:34+5:30

काणकोण : काणकोण-माशे येथे सकाळी चर्चमध्ये प्रार्थनेला जाताना रेल्वे ओव्हरब्रिजवर रेल्वेला धडकल्याने आग्नेस आफोन्सो (वय ५३) हिचा मृत्यू झाला. त्या लोलये-पोळे पंचायतीच्या माजी सरपंच होत.

Kill the women and kill women at Mass | रेल्वेला धडकून माशे येथे महिला ठार

रेल्वेला धडकून माशे येथे महिला ठार

णकोण : काणकोण-माशे येथे सकाळी चर्चमध्ये प्रार्थनेला जाताना रेल्वे ओव्हरब्रिजवर रेल्वेला धडकल्याने आग्नेस आफोन्सो (वय ५३) हिचा मृत्यू झाला. त्या लोलये-पोळे पंचायतीच्या माजी सरपंच होत.
सकाळी ६.२0 वाजण्याच्या सुमारास माशे येथून तीन महिला गालजीबाग येथील सेंट अँथनी चर्चमध्ये प्रार्थनेसाठी जात होत्या. त्या माशे येथील रेल्वे ओव्हरब्रिजवर पोहोचल्या असता, त्याच वेळेला मडगाव-मेंगलोर रेल्वे ओव्हरब्रिजवर आली. तत्काळ सर्व महिला बाजूला झाल्या. मात्र, आग्नेस हिने साडी परिधान केल्याने तिचा पदर रेल्वेच्या वार्‍याने ओढला गेला व ती बाजूला फेकली गेली. सुमारे २0 ते ३0 फूट खाली गडगडत गेल्याने ती घटनास्थळीच गतप्राण झाली.
पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह चिकित्सेसाठी पाठविला आहे. (लो.प्र.)

ढँङ्म३ङ्म : 1402-टअफ-02
कॅप्शन: आग्नेस आफोन्सो

Web Title: Kill the women and kill women at Mass

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.