खरीप अनुदानाचे वाटप पूर्ण
By Admin | Updated: March 8, 2015 00:31 IST2015-03-08T00:31:02+5:302015-03-08T00:31:02+5:30
४ लाख ८५ हजार शेतकर्यांच्या खात्यावर पैसे जमाऔरंगाबाद : जिल्ह्यातील शेतकर्यांसाठी राज्य सरकारकडून मिळालेल्या खरीप अनुदानाच्या संपूर्ण रकमेचे वाटप ...

खरीप अनुदानाचे वाटप पूर्ण
>४ लाख ८५ हजार शेतकर्यांच्या खात्यावर पैसे जमाऔरंगाबाद : जिल्ह्यातील शेतकर्यांसाठी राज्य सरकारकडून मिळालेल्या खरीप अनुदानाच्या संपूर्ण रकमेचे वाटप पूर्ण झाले आहे. जिल्ह्यातील ४ लाख ८५ हजार शेतकर्यांच्या बँक खात्यावर एकूण २३९ कोटी रुपयांची रक्कम जमा करण्यात आली आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे मराठवाड्यासह राज्यातील इतरही काही जिल्ह्यांत खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शेतकर्यांना वैयक्तिक आर्थिक मदत देण्याचे डिसेंबर महिन्यात जाहीर केले. मराठवाड्यातील सर्व गावांची पैसेवारी पन्नासच्या आत आलेली आहे. त्यामुळे विभागातील सर्व शेतकरी या मदतीसाठी पात्र ठरले आहेत. त्यात औरंगाबाद जिल्ह्यातील ५ लाख ८० हजार शेतकर्यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील सर्व शेतकर्यांना मदत वाटपासाठी एकूण २८८ कोटी रुपये निधी लागणार आहे. राज्य सरकारने आतापर्यंत दोन टप्प्यात वरीलपैकी २३९ कोटी रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाला उपलब्ध करून दिला होता. या संपूर्ण निधीचे वाटप पूर्ण झाले आहे. जिल्ह्यातील ४ लाख ८५ हजार शेतकर्यांच्या बँक खात्यावर ही रक्कम जमा करण्यात आली असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र राजपूत यांनी सांगितले. एक लाख शेतकर्यांना मदतीची प्रतीक्षाजिल्ह्यातील ५ लाख ८० हजार शेतकर्यांपैकी आतापर्यंत ४ लाख ८५ हजार शेतकर्यांनाच शासनाची वैयक्तिक मदत मिळाली आहे. अजूनही जवळपास एक लाख शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित आहे. या शेतकर्यांना मदत देण्यासाठी आणखी ४९ कोटी रुपयांची मदत मिळणे बाकी आहे. ही मदत कधी मिळणार हे शासनाने अद्याप स्पष्ट केलेले नाही. ----------------------- अनुदान वाटपाची तालुकानिहाय स्थिती तालुका वितरित निधी शेतकरी औरंगाबाद २४ कोटी ६ लाख ४४४८५ पैठण ३८ कोटी ११ लाख ७४८२९ फुलंब्री १८ कोटी ३५ लाख ४२७३८ वैजापूर ४३ कोटी ९४ लाख ८१७७४ गंगापूर ३४ कोटी २५ लाख ६९१०७खुलताबाद१० कोटी ८८ लाख २२७८६ सिल्लोड २७ कोटी १७ लाख ५९११३ कन्नड २९ कोटी ८५ लाख ६४२८४सोयगाव १३ कोटी २३ लाख २६७२१----------------------------------------------- एकूण २३९ कोटी ८८ लाख ४८५८३७ -------------------------------------------------------