शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Amritpal Singh: 12 दिवसांपासून फरार अमृतपालचा पोलिसांना इशारा; व्हिडिओत म्हणाला, कुणी केसालाही धक्का लावू शकत नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2023 20:04 IST

Who is Amitpal Singh: "खरे तर मला अटक करण्याचा सरकारचा हेतू नव्हता. मला अटकेची भीती वाटत नाही...."

खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंगने एक नवा व्हिडिओ जारी केला आहे. 18 मार्चनंतर अमृतपाल पहिल्यांदाच समोर आला आहे. अमृतपालला पकडण्यासाठी पोलीस सातत्याने प्रयत्न करत आहेत. अमृतपालने या नव्या व्हिडिओत म्हटले आहे, जर पोलिसांना मला अटक करायची असती तर त्यांनी मला घरून अटक केली असती. मला माळव्याला जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न झाला. खरे तर मला अटक करण्याचा सरकारचा हेतू नव्हता. मला अटकेची भीती वाटत नाही. अमृतपाल सातत्याने पोलिसांना चकमा देत आहे.

व्हिडिओमध्ये काय म्हणाला अमृतपाल - या व्हिडिओमध्ये अमृतपाल देश-विदेशातील शीख समुदायाच्या लोकांना एकत्रित येण्यास सांगत आहे. व्हिडिओमध्ये तो म्हणतो, मी शीख समाजाला आवाहन करतो की, त्यांनी बैसाखीच्या मुहुर्तावर सरबत खालसामध्ये सहभागी व्हावे आणि शीख समुदायाच्या छोट्या-मोठ्या समस्यांवर चर्चा करावी. कारण आपला समाज दीर्घ काळापासून छोट्य-छोट्या गोष्टींमध्येच अडकला आहे. आपण आपले प्रश्न सोडवायला हवेत. सरकारने आपमच्या सोबत धोका केला आहे. आमच्या सहकाऱ्यांना NSA वावून आसामला पाठविण्यात आले आहे. कारण ते शीख धर्मासंदर्भात बोलत होते.

अमृतपाल पुढे म्हणाला, माझ्या अनेक सहकाऱ्यांना आसामला पाठवण्यात आले आहे. तर काहींना तुरुंगात टाकण्यात आले आहे. हा अत्याचार आहे. आपण ज्या मार्गावर चालत आहोत त्या मार्गावर आपल्याला हे सर्व सहन करावे लागेल आणि हे आपले सामाजिक कर्तव्य आहे. याच बरोबर, आपण देशात आणि परदेशात स्थाइक झालेल्या सर्व शीख बांधवांना आवाहन करतो की, बैसाखीच्या दिवशी होणाऱ्या सरबत खालसाकडे लक्ष असू द्या आणि आमच्या जत्थेदार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे धार्मिक कीर्तनांचे आयोजन करून आणि गावोगावी जाऊन लोकांना जागरुक करा.

एवढेच नाही, तर, माझे समाजाला आवाहन आहे की, जर आपल्याला पंजाबचे तरुण्य वाचवायचे असेल आणि आपले हक्क मिळवायचे असतील, तर आपण संघटित व्हायरला हवे. राहिले माझ्या अटकेचे, तर ते खऱ्या शासकाच्या हातात आहे. मी मजेत आहे. कुणी माझ्या केसालाही धक्का लावू शकत नाही.

टॅग्स :Amritpal Singhअमृतपाल सिंगPunjabपंजाबCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस