शहरं
Join us  
Trending Stories
1
Video : एका खेळाडूवर अवलंबून नाही! IND vs PAK लढतीपूर्वी विराटच्या प्रश्नावर Rohit Sharmaचं उत्तर
2
पंकजाताई निवडून नाही आल्या तर...; व्हायरल व्हिडिओतील युवकाचा मृतदेह आढळला 
3
"मला मंत्री व्हायचं नाही, तर..."; मंत्रिपदाच्या शर्यतीतून श्रीकांत शिंदेंची माघार?
4
निकालानंतर 'या' शहरातील लोकांची चांदी; जमिनीच्या भावात तब्बल ५०-१०० टक्क्यांनी वाढ
5
३ धावांवर ३ विकेट्स! Quinton de Kock 'डायमंड डक' ठरला, आफ्रिकेचा डाव गडगडला, Video 
6
रेसकोर्सची जमीन हडपण्याचा प्रयत्न थांबवा; आदित्य ठाकरे यांचे राज्यपालांना पत्र
7
"NDA सरकार पडणार", PM मोदींच्या शपथविधीपूर्वी ममता बॅनर्जींचे मोठे भाकीत
8
रोहित शर्माला पुन्हा दुखापत, संजना गणेसनची पोस्ट अन् जसप्रीत बुमराह नेतृत्व करण्याची चर्चा
9
Sonia Gandhi : सोनिया गांधी काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा, खरगे यांचा प्रस्ताव मंजूर
10
दक्षिण आफ्रिकेने फास आवळला, नेदरलँड्सचा संघ कसाबसा शतकपार पोहोचला
11
Monsoon Update : महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी! मान्सून काही तासांत मुंबईत धडकणार
12
राष्ट्रीय महामार्गावरचा दिशादर्शक फलक काेसळला; दुचाकीस्वार ठार 
13
...तर INDIA आघाडीनं आणखी ९ जागा जिंकल्या असत्या; महाराष्ट्रातील ४ जागांचा समावेश
14
"एखादं मंत्रिपद मिळावं म्हणून शिंदे गटाची आदळआपट सुरु"; राजकीय भूकंपावरुन सुषमा अंधारेंचं प्रत्युत्तर
15
रोहित, विराट यांना मित्रच समज...! शाहीन आफ्रिदीला भारतीय चाहत्यांना प्रेमळ सल्ला, Video 
16
SBIच्या शेअर्सवर गुंतवणूकदारांच्या उड्या; एक्सपर्ट म्हणाले, "१००० च्या वर जाणार..."
17
चीनमधून एक बातमी आली अन् सोनं 'धडाम'...; गुंतवणूकदारांचं टेन्शन वाढण्याची शक्यता!
18
देवेंद्र फडणवीसांचा मित्रपक्षासह स्वपक्षातील नेत्यांना सल्ला; "आता ही वेळ जाहीरपणे..."
19
Flipkart पूर्वी PhonePe चा येणार आयपीओ, काय आहे प्लॅन; जाणून घ्या
20
'भिंतीवरचं पेंटिंग मिटवशील पण सत्य...?', दलजीत कौरने पुन्हा पतीवर साधला निशाणा

लुधियाना कोर्ट ब्लास्टमध्ये खलिस्तानी गटाचा हात, गुप्तचर यंत्रणांचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2021 12:21 PM

लुधियानातील न्यायालयात काल झालेल्या स्फोटामागे खलिस्तान समर्थित गटाची भूमिका समोर आली आहे. तसेच, या गटाला पाकिस्तानच्या ISIने मदत केल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे.

चंदीगड: काल म्हणजेच 23 डिसेंबरला पंजाबच्या लुधियाना कोर्टात भीषण स्फोट (Ludhiana Bomb Blast) झाला होता. त्या स्फोटात एकाचा मृत्यू झाला, तर पाचजण गंभीर जखमी झाले. दरम्यान, आता या स्फोटामागे खलिस्तान समर्थित गटाची भूमिका समोर आली आहे. तसेच, या गटाला पाकिस्तानच्या आयएसआयने मदत केल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. 

अनेक कट उधळून लावलेएएनआय (ANI) या वृत्तसंस्थेने सांगितल्यानुसार, एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, लाल किल्ल्यातील घटनेनंतर एजन्सी अलर्ट मोडवर आहेत. खलिस्तानी गट त्यांच्या चळवळीला पुनरुज्जीवित करण्याच्या तयारीत आहेत, पण या सर्व घडामोडींवर सुरक्षा यंत्रणांचे लक्ष आहे. रिपोर्टनुसार, पाकिस्तानात बसलेले हँडलर पंजाबमधील दहशतवादी कारवायांसाठी त्यांच्या साथीदारांना सूचना देत आहेत. पण, मागील काही दिवसात राज्य पोलिसांच्या सहकार्याने असे अनेक कट उधळून लावण्यात आले आहेत.

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, “आम्हाला स्थानिक टोळ्यांचा समावेश आणि पाकिस्तानमध्ये ISI-समर्थित खलिस्तानी चळवळ पुन्हा सुरू झाल्याची विशिष्ट माहिती मिळाली होती. ही माहिती स्थानिक पोलिसांशी शेअर केली. यानंतर फरार किंवा जामिनावर सुटलेल्या गुन्हेगारांची यादी तयार करण्यासाठी संपूर्ण राज्यात कारवाई करण्यात आली. या कारवायादरम्यान अनेक कट उधळून लावण्यात आले आहेत.''

नोव्हेंबरमध्ये आर्मी कॅंटच्या गेटवर झालेला ग्रेनेड हल्ला हe देखील एक दहशतवादी कटाचा भाग होता. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, “या वर्षी पंजाबजवळ सुमारे 42 ड्रोन पाहण्याची प्रकरणे नोंदवली गेली आहेत. पाकिस्तानने ड्रोनच्या मदतीने टाकलेली स्फोटके आणि शस्त्रे राज्यात अशांतता निर्माण करण्यासाठी वापरली जाणार आहेत. याच पार्श्वभू राज्यातील सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत.

मोठ्या प्रमाणात स्फोटके जप्तगेल्या पाच महिन्यांत पंजाब पोलिसांनी सीमावर्ती शहरांमधून 7 टिफिन बॉम्ब आणि 10 हून अधिक हातबॉम्ब जप्त केले आहेत. ऑगस्टमध्येच पंजाब पोलिसांनी जर्नेल सिंग भिंद्रनवालेच्या पुतण्याचा मुलगा गुरुमुख सिंग याला अटक केली होती. त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. निवडणुकीपूर्वी मोठा कट घडवून आणण्यासाठी त्याला पाकिस्तानातील आयएसआय आणि इतर खलिस्तान समर्थित दहशतवादी गटांकडून मदत मिळत असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. 

टॅग्स :Courtन्यायालयBombsस्फोटकेBlastस्फोटISIआयएसआय