Keralam Assembly Election 2026 : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केरळमधील कुन्नाथुनाडू येथे आयोजित सभेतून राज्यातील तरुणांना राज्यातच रोजगार उपलब्ध करून देण्यावर भर देत NDA सरकारला संधी देण्याचे आवाहन केले. यावेळी शाहांनी केरळमधील सुशिक्षित तरुणांना नोकऱ्या नसल्याचा मुद्दा उपस्थित केला आणि NDA सरकार आल्यास रोजगारनिर्मिती करून तरुणांना गल्फ देशात जाण्यापासून रोखू, असे आश्वासन दिले.
केरळमचे तरुण सुशिक्षित, पण नोकऱ्या नाहीत...
अमित शाह म्हणाले की, भारतात सर्वात आधी साक्षर राज्य म्हणून केरळम ओळखले गेले. येथील तरुण शिक्षित आणि बुद्धिमान आहेत, पण त्यांच्याकडे रोजगार नाही. आम्हाला असे केरळम घडवायचे आहे, जिथे तरुणांना राज्यातच रोजगार मिळेल आणि नोकरीसाठी गल्फ देशात जावे लागणार नाही.
कम्युनिस्ट आणि काँग्रेसवर टीका...
शाहांनी कम्युनिस्ट आणि काँग्रेस पक्षावर टीका करत सांगितले की, कम्युनिस्ट पक्ष जगभरातून संपत चालला आहे, तर काँग्रेस देशातून संपत आहे. देश आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली वेगाने प्रगती करत आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत केरळममध्ये NDA ला १४% मते मिळाली होती, आता राज्यात NDA सरकार स्थापन करण्याची वेळ आली आहे.
LDF आणि UDF दोन्ही पक्षांवर भ्रष्टाचाराचे आरोप
शाह पुढे म्हणाले की, केरळममध्ये अनेक वर्षे UDF आणि LDF आळीपाळीने सत्तेत येत आहेत, पण दोन्ही पक्ष भ्रष्टाचारात सहभागी आहेत. जर खरा विकास हवा असेल, तर नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली NDA सरकार निवडणे आवश्यक आहे.
PFI आणि वक्फ कायद्याचा मुद्दा
अमित शांहांनी सांगितले की, BJP ची धोरणे स्पष्ट आहेत. सर्वांना न्याय, कोणाचेही तुष्टीकरण नाही. PFI भारतविरोधी कारवायांमध्ये सहभागी असल्याचे आढळल्यावर सरकारने एका दिवसात मोठी कारवाई केली. तसेच वक्फ सुधारणा विधेयकाचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, एर्नाकुलममध्ये वक्फ बोर्डाने सुमारे ४०० एकर जमीन घेतली होती, जी प्रत्यक्षात ६०० ख्रिश्चन आणि हिंदू कुटुंबांची होती. या मुद्द्यावर LDF आणि UDF यांनी संसदेत आवाज उठवला नाही, असा आरोप त्यांनी केला.
काँग्रेस-कम्युनिस्ट डबल स्टँडर्ड
देशाच्या इतर भागात काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्ष एकत्र येऊन निवडणुका लढतात, पण केरळममध्ये ते एकमेकांविरुद्ध लढतात. राहुल गांधी आणि मुख्यमंत्री पिनराई विजयन एकमेकांना BJP ची ‘B टीम’ म्हणतात, पण या निवडणुकीत BJP ‘A टीम’ असेल, असेही त्यांनी सांगितले.
Web Summary : Amit Shah targeted communists and Congress, promising Kerala youth jobs within the state if NDA wins. He criticized LDF and UDF for corruption and highlighted BJP's stance on PFI and Waqf issues, accusing rivals of double standards.
Web Summary : अमित शाह ने कम्युनिस्टों और कांग्रेस पर निशाना साधा, वादा किया कि अगर एनडीए जीतती है तो केरल के युवाओं को राज्य के भीतर ही नौकरियां मिलेंगी। उन्होंने एलडीएफ और यूडीएफ की भ्रष्टाचार के लिए आलोचना की और पीएफआई और वक्फ मुद्दों पर भाजपा के रुख को उजागर किया, प्रतिद्वंद्वियों पर दोहरे मापदंड का आरोप लगाया।