केरळमध्ये 14 वर्षांच्या मुलीनं कुटुंबातील 6 जणांना सायनाइड देऊन केलं ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2019 16:15 IST2019-10-06T16:15:15+5:302019-10-06T16:15:22+5:30
केरळमधल्या कोझिकोड जिल्ह्यातील पोलिसांनी एकाच कुटुंबातील 6 जणांच्या हत्येचा उलगडा केला आहे.

केरळमध्ये 14 वर्षांच्या मुलीनं कुटुंबातील 6 जणांना सायनाइड देऊन केलं ठार
कोझिकोडः केरळमधल्या कोझिकोड जिल्ह्यातील पोलिसांनी एकाच कुटुंबातील 6 जणांच्या हत्येचा उलगडा केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, कुटुंबातीलच एका 14 वर्षांच्या मुलीनं सायनाइड देऊन कुटुंबातील 6 सदस्यांचा खून केला आहे. 14 वर्षांच्या जॉलीअम्मानं स्वतःचा गुन्हा कबूल केला आहे. पोलिसांनी या हत्ये प्रकरणात तिघांना अटक केली आहे.
पोलीस आता जॉलीविरोधात पुरावे गोळा करत आहेत. जॉलीशिवाय अटक करण्यात आलेल्या इतर आरोपींमध्ये एमएम मॅथ्यू आणि कुमार यांच्यावर जॉलीला सायनाइड पुरवल्याचा आरोप आहे. कोझिकोड जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्रभारी केजी सायमन यांनी सांगितलं की, रॉय यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. त्याचदरम्यान त्यांच्या शरीरात सायनाइड सापडलं होतं. प्रकरणाचा तपास सुरू असून, आरोपींवर इतर अन्य पाच हत्यांचेही गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. रॉय थॉमस यांचा मृत्यू 2011 साली झाला होता.