भांडणामुळे महिलेने ८० फूट खोल विहिरीत मारली उडी; वाचवण्याच्या प्रयत्नात अग्निशमन दलाच्या जवानासह प्रियकराचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 14:55 IST2025-10-13T14:35:13+5:302025-10-13T14:55:53+5:30

केरळमध्ये विहीरीमध्ये पडलेल्या महिलेला वाचवताना तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Kerala woman jumps into well three people including fireman who went to rescue her die | भांडणामुळे महिलेने ८० फूट खोल विहिरीत मारली उडी; वाचवण्याच्या प्रयत्नात अग्निशमन दलाच्या जवानासह प्रियकराचा मृत्यू

भांडणामुळे महिलेने ८० फूट खोल विहिरीत मारली उडी; वाचवण्याच्या प्रयत्नात अग्निशमन दलाच्या जवानासह प्रियकराचा मृत्यू

Kerala Accident: केरळमध्ये एका हृदयाद्रावक घटनेत तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. केरळमधील कोल्लम येथे एका महिलेने विहिरीत उडी मारली होती. महिलेला वाचवण्यासाठी रात्री उशिरापर्यंत बचाव कार्य सुरू होते. मात्र या बचाव कार्यात एका अग्निशमन अधिकाऱ्यासह तीन जणांना आपला जीव गमवावा लागला. मृतांमध्ये कोट्टारक्कारा अग्निशमन आणि बचाव युनिटमधील अग्निशमन दलाचे कर्मचारी सोनी एस. कुमार (३६), विहिरीत उडी मारणारी महिला अर्चना (३३) आणि तिचा प्रियकर शिवकृष्णन (२२) यांचा समावेश आहे.

अर्चना परिचारिकेचे काम करायची. अर्चनाचे शिवकृष्णनसोबत प्रेमसंबंध होते. गेल्या दोन महिन्यांपासून ती त्याच्यासोबत राहत होती. शिवकृष्णन त्या रात्री दारू पिऊन घरी परतला आणि गोंधळ घालू लागला. वाद वाढू नये म्हणून अर्चनाने उरलेली दारू घरात लपवून ठेवली. संतापलेल्या शिवकृष्णनने तिच्यावर हल्ला केला. या वादानंतर अर्चनाने तिच्या घराच्या अंगणात असलेल्या विहिरीत उडी मारली. त्यामुळे शिवकृष्णन घाबरला आणि त्याने अग्निशमन दलाला या घटनेची माहिती दिली. मात्र बचावकार्यादरम्यान, तीन जणांना आपला जीव गमवावा लागला. 

ही घटना रात्री १२:१५ च्या सुमारास घडली. त्यानंतर कोट्टारक्कारा अग्निशमन आणि बचाव केंद्राला नेदुवाथूर येथील ८० फूट खोल विहिरीत एक महिला पडल्याचा  फोन आला. बचाव पथके पोहोचली तेव्हा अर्चनाची दोन मोठी मुले रस्त्याच्या कडेला वाट पाहत होती आणि त्यांनी अधिकाऱ्यांना त्यांच्या घरी नेले आणि त्यांना सांगितले की त्यांची आई विहिरीत अडकली आहे. अग्निशमन अधिकारी सोनी एस. कुमार हे दोरी आणि इतर सुरक्षा उपकरणांचा वापर करून अर्चनाला वाचवण्यासाठी विहिरीत उतरले. मात्र अर्चनाला वर काढण्याचा प्रयत्न करत असताना, विहिरीवरील कठडा कोसळला. ज्यामुळे सोनी आणि अर्चना दोघेही खोल पाण्यात पडले.

या गोंधळादरम्यान, जवळच उभा असलेला शिवकृष्णन देखील विहिरीत पडला. प्रत्यक्षदर्शी आणि अधिकाऱ्यांनी सांगितले की जेव्हा शिवकृष्णनही आधारासाठी तिथे टेकून उभा राहिला तेव्हा कमकुवत कठडा कोसळला. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने बचावकार्य सुरू केले आणि जखमी झालेल्या तिघांना विहिरीतून बाहेर काढले. त्यांना ताबडतोब जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले पण तिघांचाही मृत्यू झाला.

स्थानिकांच्या मते, अर्चना आणि शिवकृष्णन काही काळ एकत्र राहत होते आणि आदल्या रात्री त्यांच्यात घरगुती वाद झाला होता, ज्यामुळे अर्चनाने विहिरीत उडी मारली. तासभर चाललेल्या बचाव कार्यानंतर, अर्चना आणि इतरांना बाहेर काढण्यात आले. अर्चना आणि शिवकृष्णन गेल्या दोन महिन्यांपासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. 
 

Web Title : झगड़े के बाद महिला ने कुएं में लगाई छलांग; रक्षक, प्रेमी की मौत

Web Summary : केरल में, एक महिला ने अपने प्रेमी के साथ झगड़े के बाद कुएं में छलांग लगा दी। बचाव के दौरान एक दमकलकर्मी और प्रेमी की मौत हो गई। महिला की भी मौत हो गई।

Web Title : Woman jumps into well after fight; rescuer, lover die.

Web Summary : In Kerala, a woman jumped into a well after a fight with her lover. A firefighter and the lover died during the rescue. The woman also died.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.