शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्याच्या कामगिरीत केरळ देशात पहिले, आंध्र दुसऱ्या, तर महाराष्ट्र तिसऱ्या स्थानी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2019 04:45 IST

आरोग्यविषयक सर्वोत्तम कामगिरीबाबत केरळने देशात प्रथम क्रमांक पटकाविला. दुसºया तसेच तिस-या क्रमांकावर अनुक्रमे आंध्र प्रदेश व महाराष्ट्र आहेत.

नवी दिल्ली - आरोग्यविषयक सर्वोत्तम कामगिरीबाबत केरळने देशात प्रथम क्रमांक पटकाविला. दुसºया तसेच तिस-या क्रमांकावर अनुक्रमे आंध्र प्रदेश व महाराष्ट्र आहेत. या क्षेत्रातील सर्वात खराब कामगिरी उत्तर प्रदेशमध्ये आहे. नीती आयोगाने जाहीर केलेल्या दुस-या आरोग्य निर्देशांक अहवालामध्ये ही स्थिती आढळून आली आहे.देशातील २०१५-१६ (मूळ वर्ष) ते २०१७-१८ (संदर्भ वर्ष) या कालावधीत आरोग्य स्थितीचा या निर्देशांक अहवालात अभ्यास करण्यात आला. आरोग्य क्षेत्रातील २३ निकषांनुसार राज्ये, केंद्रशासित प्रदेश येथील परिस्थितीचा अभ्यास करण्यात आला.

आरोग्यक्षेत्राचा विकास होत असलेल्या पहिल्या तीन राज्यांमध्ये हरियाणा, राजस्थान, झारखंड यांचा समावेश होतो. देशातील आरोग्य निर्देशांकाबाबत पहिल्या फेरीचा अहवाल फेब्रुवारी महिन्यात जाहीर करण्यात आला. त्यामध्ये या क्षेत्रात राज्ये व केंद्रशासित प्रदेशांनी २०१४-१५ ते २०१५-१६ या कालावधीत केलेल्या वार्षिक तसेच वाढीव विकासाची नोंद घेण्यात आली होती. जागतिक बँकेच्या मदतीने केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण विभागाने हा अहवाल तयार केला आहे.जन्मापासून मृत्युदरापर्यंतचा अभ्यासदेशातील विविध राज्ये, केंद्रशासित प्रदेशांमध्ये जन्माला आल्यापासून २९ दिवसांच्या किंवा वयाच्या ५ वर्षांच्या आत किती बालकांचा मृत्यू झाला, एकूण जननदर, अशा अनेक गोष्टी आरोग्य निर्देशांक अहवाल तयार करताना तपासण्यात आल्या. अतिशय कमी वजन असलेली किती बालके जन्माला आली, जन्माला आलेल्या अपत्यांमध्ये मुलगा व मुलगी यांचे किती प्रमाण होते, अशा गोष्टींचाही बारकाईने विचार करण्यात आला. त्याचप्रमाणे आरोग्यसेवेच्या दर्जाचीही पाहणी करण्यात आली. त्यानंतर सर्वोत्तम व खराब कामगिरीनुसार राज्ये, केंद्रशासित प्रदेशांची क्रमवारी तयार करण्यात आली.

टॅग्स :Healthआरोग्यKeralaकेरळAndhra Pradeshआंध्र प्रदेशMaharashtraमहाराष्ट्र