शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

वडील मजूर, बहिणीच्या लग्नानंतर कर्जाचा डोंगर; शाळेबाहेर भुईमुगाच्या शेंगा विकते विद्यार्थिनी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2024 16:24 IST

विनिशा शाळा सुटल्यानंतर हातगाडीवर भुईमुगाच्या शेंगा विकते. ती रात्री आठ वाजेपर्यंत हे काम करते.

शिक्षणासाठी अनेकांना फार कठोर परिश्रम घ्यावे लागतात. मात्र, केरळमधील एका विद्यार्थिनीने तिची स्वप्न सत्यात उतरवण्याचा निर्धार केला आहे आणि ती दररोज त्यासाठी खूप मेहनत घेत आहे. केरळमधील चेरथला येथील विनिशा ही शाळेत जाण्यासाठी कठोर परिश्रम करत आहे आणि त्याच वेळी आपला उदरनिर्वाह करण्याचा प्रयत्न करत आहे. विद्यार्थिनी शाळा सुटल्यावर शाळेबाहेरच भुईमुगाच्या शेंगा विकते.

विनिशा शाळा सुटल्यानंतर हातगाडीवर भुईमुगाच्या शेंगा विकते. ती रात्री आठ वाजेपर्यंत हे काम करते. बहिणीच्या लग्नानंतर कुटुंबावर मोठं कर्ज झाल्याने विनिशाने भुईमुगाच्या शेंगा विकण्यास सुरुवात केली. तिचे वडील मजूर आहेत आणि आई भुईमुगाच्या शेंगा विकण्याचं काम करते. हे विकण्यासाठी तासनतास उभे राहिल्याने त्याच्या आईला पाय दुखायचे. 

घरची परिस्थिती आणि आईला होणार त्रास पाहून विनिशाने पुढाकार घेऊन भुईमुगाच्या शेंगा विकण्याचा मोठा निर्णय घेतला. विनिशा गेल्या चार वर्षांपासून तिच्या पालकांना मदत करत आहे. एशियानेटने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये विनिशा म्हणाली की ती दुपारी साडेचार वाजता काम सुरू करते आणि रात्री आठ वाजेपर्यंत करत असते. 

भुईमुगाच्या शेंगा विकल्यानंतर ती अभ्यासासाठी घरी जाते. ती प्रामाणिकपणे काम करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र रस्त्यावरून जाणारे लोक तिची कशी चेष्टा करतात हे देखील तिने सांगितलं. ती आधी शाळेनंतर ट्यूशनला देखील जायची. पण आता हे काम करत असल्याने दोन्ही गोष्टी करणं तिच्यासाठी अवघड आहे. त्यामुळे तिने भुईमुगाच्या शेंगा विकण्याचं काम करण्याचा निर्णय घेतला आहे.  

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टीEducationशिक्षणSchoolशाळाStudentविद्यार्थी