शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

केरळमध्ये पावसाचा हाहाकार, एका क्षणात अख्ख घर नदीच्या पाण्यात गेलं वाहून; पाहा VIDEO

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2021 9:03 AM

Kerala Rain: केरळमध्ये पावसामुळे झालेल्या विविध घटनांमध्ये 18 जणांचा मृत्यू झाला आहे.

तिरुअनंतपुरम: सध्या केरळ(Kerala) राज्यात पावसाने थैमान घातले आहे. केरळच्या काही भागात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे(Heavy Raining in Kerala) विविध घटनांमध्ये 18 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच अनेक लोक बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, केरळच्या विविध भागातून पावसाशी संबंधित अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरही येत आहेत. असाच एक व्हिडिओ कोट्टायमच्या मुंडकायममधून समोर आला आहे.

या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, या भागात मुसळधार पाऊस पडत आहे. पावसामुळे नदीने रौद्र रुप धारण केलंय. या पाण्याच्या वेगामुळे रस्त्याच्या कडेला बांधलेलं एक पक्कं घर सुरुवातीला थोडं वाकतं आणि नंतर अख्ख घर नदीत वाहून जातं. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. घर नदीन कोसळलं तेव्हा घरात कुणीच नव्हतं.

कोट्टायममध्ये कुटुंबातील सर्वांचा मृत्यूदरम्यान, केरळमधील पावसामुळे कोट्टायम जिल्ह्यात 40 वर्षीय व्यक्ती, त्याची 75 वर्षीय आई, 35 वर्षीय पत्नी आणि 14, 12 आणि 10 वर्षांच्या तीन मुलींसह कुटुंबातील सहा सदस्यांचा कोट्टायममधील कुट्टिक्कल येथे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घढली आहे.  भूस्खलनामध्ये या कुटुंबाचे घर वाहून गेले. शनिवारी तीन जणांचे मृतदेह सापडले, इतरांचा शोध सुरू आहे.

मोदींची केरळच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चादुसरीकडे, केरळमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांनी रविवारी केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन(Pinarayi Vijayan) यांच्याशी परिस्थितीबाबत चर्चा केली. पंतप्रधान मोदींनी ट्विट केलं, 'केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्याशी बोललो आणि केरळमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलनाच्या पार्श्वभूमीवर परिस्थितीवर चर्चा केली. जखमी आणि बाधितांना मदत करण्यासाठी अधिकारी कार्यरत आहेत.

टॅग्स :Kerala Floodsकेरळ पूरKeralaकेरळRainपाऊसlandslidesभूस्खलनNarendra Modiनरेंद्र मोदी