केरळ लोकसभा निवडणूक निकाल 2019: डाव्यांच्या केरळमध्ये चालणार का राहुल गांधींची जादू?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2019 10:18 AM2019-05-23T10:18:07+5:302019-05-23T10:19:22+5:30

Kerala Lok Sabha Election Result 2019 : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी वायनाड मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरल्याने राज्यातील लढती रंगतदार झाल्या आहेत.

Kerala Lok Sabha election results 2019: Will Rahul Gandhi's magic be run in the Left's Kerala? | केरळ लोकसभा निवडणूक निकाल 2019: डाव्यांच्या केरळमध्ये चालणार का राहुल गांधींची जादू?

केरळ लोकसभा निवडणूक निकाल 2019: डाव्यांच्या केरळमध्ये चालणार का राहुल गांधींची जादू?

केरळ : डाव्यांचा गड मानला जाणाऱ्या केरळमध्ये शबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशावरून गेल्या काही काऴापासून जनक्षोभ उसळला होता. याचा फायदा भाजपाने उठविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी वायनाड मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरल्याने राज्यातील लढती रंगतदार झाल्या आहेत. यामुळे एकूण 20 पैकी 7 मतदारसंघात काँग्रेसचे खासदार असताना या निवडणुकीत यामध्ये भर पडते का हे पाहणे औत्स्युक्याचे ठरणार आहे. 

केरळमध्ये गेल्या वर्षी शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. यावरून भाविकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला होता. पोलिसांना मंदिर परिसरात मोठा बंदोबस्त तैनात करावा लागला होता. तसेच हजारो आंदोलकांना ताब्यातही घेतले गेले होते. यावरून भाजपाने लोकसभा निवडणुकीसाठी फायदा उचलण्याचा प्रयत्न केला होता. भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनीही याबाबत वक्तव्ये केली होती. 

मात्र, लोकसभा निवडणुकीत भाजप विरुद्ध डावे असा संघर्ष दिसत असताना अचानक राहुल गांधी यांनी अमेठीसह वायनाडमध्ये निवडणूक लढण्याचा घेतलेला निर्णय कलाटणी देणारा ठरला आहे. राहुल यांच्या उमेदवारीमुळे आसपासच्या जागांना याचा फायदा होण्याची शक्यता आहे. राहुल यांच्या या उमेदवारीला डाव्यांनीही आक्षेप घेतला होता. त्यातच गेल्या वर्षी आलेल्या महापुरामुळे केंद्र सरकारने केलेली मदतही भाजपासाठी जमेची बाजू ठरणारी आहे. यावरूनही डाव्यांनी मदत कमी दिल्याचा आरोप केला होता. 

Web Title: Kerala Lok Sabha election results 2019: Will Rahul Gandhi's magic be run in the Left's Kerala?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.