kerala husband forced the wife to drink alcohol and then raped her | विकृतीचा कळस! लहान मुलासमोरच मित्रांसोबत मिळून पतीनं केला पत्नीवर सामूहिक बलात्कार, सहा जण अटकेत

विकृतीचा कळस! लहान मुलासमोरच मित्रांसोबत मिळून पतीनं केला पत्नीवर सामूहिक बलात्कार, सहा जण अटकेत

तिरुअनंतपूरमः कोरोनानं देशात टाळेबंदी आहे. अनेक जण घरातच थांबलेले आहेत. परंतु देशात काही राज्यांमध्ये बलात्कारच्या घटनाही समोर येत आहेत. केरळमधील तिरुअनंतपूरममध्ये पती आणि त्याच्या मित्रांनी एका महिलेवर पाच वर्षांच्या मुलासमोर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महिलेनं पोलिसांत तक्रार दिल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं. तिरुअनंतपूरम येथे ४ जून रोजी ही घटना घडली असून, पोलिसांनी याप्रकरणी कारवाई करत पतीसह एकूण सहा जणांना अटक केली आहे.

पतीने पत्नीला दारू पाजून मित्रांसोबत बलात्कार केला, त्यानंतर पतीच्या मित्रांनीही त्या महिलेवर आळीपाळीनं बलात्कार केला. पोलिसांनी पतीसह त्याच्या मित्रांना अटक केली असून,  तिच्या पतीसह सर्व आरोपींवर अपहरण, प्राणघातक हल्ला आणि सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मुलासमोर घडली असल्याने बाल संरक्षण लैंगिक अपराध संरक्षण कायद्यांतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केरळ राज्य महिला आयोगाने या प्रकरणाची दखल घेतली असून, तिरुअनंतपुरम ग्रामीण पोलीस अधीक्षकांकडून अहवाल मागविला आहे. या महिलेने पोलिसांना सांगितले की, तिचा नवरा तिला आणि आपल्या दोन्ही मुलांना गुरुवारी मित्राच्या घरी घेऊन गेला. तेथे तिला जबरदस्तीने मद्यपान करण्यास भाग पाडले आणि नंतर तिच्या मोठ्या मुलासमोर बलात्कार केले. महिलेने तेथून कसाबसा पळ काढत एका तरुणाची मदत घेतली. त्या तरुणानं महिलेला आपल्या घरी नेलं आणि पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली. 

ही वाचा

CoronaVirus News: धोका वाढला! राज्यात कोरोनाबाधितांची संख्या ८२ हजारांच्या पुढे, १२० रुग्णांचा मृत्यू

शिवाजी महाराजांच्या कारभाराचा जगापुढे आदर्श, हा वसा पुढे नेण्यासाठी वचनबद्ध- उद्धव ठाकरे

कोरोनाच्या संक्रमणात रक्तगटाचीही महत्त्वाची भूमिका; 'या' लोकांना जास्त धोका

'त्या चीनविरोधी जाहिरातीमुळे ट्विटरकडून अमूलचं हँडल ब्लॉक?

देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा सोडला उद्धव ठाकरेंवर 'बाण', आता केल्या 5 प्रमुख मागण्या

सोन्याचे भाव गडगडले, चांदीच्या दरातही मोठी कपात, जाणून घ्या...

चीनला मात द्यायची असल्यास त्यांच्या वस्तूंवर बहिष्कार घाला, बाबा रामदेव यांचं आवाहन

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: kerala husband forced the wife to drink alcohol and then raped her

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.