शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

Kerala Floods: केरळला हवे २६०० कोटी रुपयांचे विशेष आर्थिक साहाय्य

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 2:00 AM

Kerala Floods: केंद्राकडे केली मागणी; नैसर्गिक आपत्तीवर चर्चा करण्यास विधानसभेचे खास अधिवेशन

तिरुवनंतपुरम : मुसळधार पाऊस व पुरामुळे प्रचंड वित्त व जिवितहानी सोसावी लागलेल्या केरळने या स्थितीतून सावरण्यासाठी केंद्राकडे २६०० कोटी रुपयांची विशेष आर्थिक मदत मागितली आहे. याचा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत संमत करण्यात आला. मनरेगा या रोजगार योजनेसह केंद्राच्या विविध योजनांच्या अंतर्गत राज्याला ही मदत देण्यात यावी, असेही मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी म्हटले आहे. केरळ विधानसभेचे एक दिवसाचे खास अधिवेशन ३० आॅगस्ट रोजी होणार असून त्यात नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यात उद््भवलेल्या गंभीर स्थितीबद्दल सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे.राज्यामध्ये दोन दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. पुराचे पाणी ओसरु लागले आहे. विस्थापित लोक घरी परतू लागले आहेत. केरळमध्ये पाऊस व पुरामुळे सुमारे २० हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी व अन्य दोन मंत्र्यांनी मिळून या राज्याला हंगामी ६८० कोटी रुपयांची मदत जाहीर केली होती. राज्यातील शेतकऱ्यांनी घेतलेल्या कृषीकर्जाच्या परतफेडीला एक वर्षासाठी स्थगिती देण्याचे बँकांनी ठरविले आहे.कर्जाच्या मर्यादेत वाढ करानैसर्गिक आपत्तीने झालेल्या हानीमुळे राज्यातील १४ पैकी १३ जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर इमारती व अन्य पायाभूत सुविधांच्या पुनर्बांधणीची कामे हाती घ्यावी लागणार असून त्यासाठी कर्ज घेण्याच्या मर्यादेत वाढ करावी, अशी मागणीही केरळ सरकारने केंद्राकडे केली आहे. सध्या राज्याच्या सकल उत्पन्नाच्या ३ टक्के इतकेच कर्ज घेण्याची मुभा आहे ती ४.५ टक्क्यांपर्यंत वाढविण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे राज्याला पुनर्बांधणीच्या कामांसाठी खुल्या बाजारातून साडेदहा हजार कोटी रुपये इतक्या रकमेचे कर्ज घेणे शक्य होईल.बकरी इद, ओनमवर पाणी२५ आॅगस्ट येत असलेला ओनम हा महत्त्वाचा सण साजरा करण्याच्या मन:स्थितीत केरळमधील जनता नाही. या सणानिमित्त आयोजिलेले कार्यक्रम रद्द करून ते पैसे मदतनिधीसाठी देण्यात येणार आहेत. बुधवारी बकरी इद हा सणही फारशा उत्साहाने साजरी होईल अशी चिन्हे नाहीत.डॉक्टर, नर्सेसची गरजकेरळमध्ये आता लाखो लोकांच्या उद््ध्वस्त झालेल्या घरांची पुनर्बांधणी करण्यासाठी प्लंबर, इलेक्ट्रिशियन, सुतार ही मंडळी लागणार आहेतच पण रोगराई फैलावू नये यासाठी उपाययोजना करण्याकरिता मोठ्या संख्येने डॉक्टर, नर्सेस यांची सेवाभावी मदत राज्याला हवी आहे असे केंद्रीय पर्यटन मंत्री के. जे. अल्फोन्स यांनी म्हटले आहे.विमानतळाचे नुकसानकोची आंतरराष्ट्रीय विमानतळाचे २२० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. धावपट्टीवरच पाणी शिरल्याने हा विमानतळ २७ आॅगस्टपर्यंत बंद ठेवण्यात आला आहे.मदतीचा ओघ सुरुचदेशभरातील रेल्वेच्या कर्मचाºयांनी एक दिवसाचा पगार, मारुती सुझुकीच्या कर्मचाºयांनी ३.५ कोटी केरळ पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देण्याचे ठरविले आहे. आयटीसी, कोका कोला, हिंदुस्थान लिव्हर आदी १२ कंपन्यांनी पिण्याचे पाणी, अन्नधान्य व अन्य जीवनावश्यक वस्तू पाठविल्या आहेत. पूरग्रस्तांसाठी कोची बंदरात देशभरातून मदतीचा ओघ सुरु आहे. या वस्तूंची साठवणूक करण्यासाठी कोची पोर्ट ट्रस्टने दोन गोदामे उपलब्ध करुन दिली आहेत.यूएई देणार ७०० कोटींची मदतसंयुक्त अरब अमिरातीने (यूएई) केरळला ७०० कोटी रुपयांची मदत देण्याचे ठरविले आहे. अबुधाबीचे युवराज शेख मोहम्मद बिन झायेग अल नह्यान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दूरध्वनी करुन ही माहिती दिली. यूएईमध्ये केरळमधील हजारो नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून काम करीत आहेत. त्यांच्यामुळे विकासाला जी चालना मिळाली त्याचे स्मरण ठेवून यूएईने नैसर्गिक आपत्तीच्या वेळेस केरळला मदतीचा हात पुढे केला आहे.पाच दिवसांत १.६३ लाख नागरिकांची सुखरूप सुटका१०.७८ लाख लोक विस्थापित झाले असून त्यामध्ये २.१२ लाख महिला, १२ वर्षांखालील १ लाख मुलांचा समावेश आहे. गेल्या पाच दिवसांत पुरात अडकलेल्या १.६३ लाख नागरिकांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे.

टॅग्स :Kerala Floodsकेरळ पूरKeralaकेरळNarendra Modiनरेंद्र मोदी