kerala did disastrous thing by electing rahul gandhi says ramachandra guha | 'राहुल गांधींना निवडून देणं ही केरळच्या जनतेची मोठी चूक'

'राहुल गांधींना निवडून देणं ही केरळच्या जनतेची मोठी चूक'

ठळक मुद्दे प्रसिद्ध इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधींवर निशाणा साधला आहे.राहुल गांधींना निवडून देणं ही केरळच्या जनतेची मोठी चूक असल्याचं मत गुहा यांनी व्यक्त केलं.राहुल गांधी यांना का निवडून दिलंत? त्यांना संसदेत का पाठवलं? असा सवालही त्यांनी केला आहे.

कोझिकोड - प्रसिद्ध इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. राहुल गांधींना निवडून देणं ही केरळच्या जनतेची मोठी चूक असल्याचं मत रामचंद्र गुहा यांनी व्यक्त केलं आहे. तसेच राहुल गांधी यांना का निवडून दिलंत? त्यांना संसदेत का पाठवलं? असा सवालही त्यांनी केला आहे. केरळच्या कोझिकोड येथे आयोजित करण्यात आलेल्या साहित्य महोत्सवात गुहा यांनी असं म्हटलं आहे. 

'व्यक्तिगतरित्या मी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात नाही. राहुल सभ्य आहेत. चांगले व्यक्ती आहेत. पण सध्या यंग इंडिया पाचव्या पिढीच्या वंशजाला स्वीकारत नाही. त्यामुळे तुम्ही राहुल गांधी यांना का निवडून दिलंत? त्यांना संसदेत का पाठवलं?, राहुल गांधी यांना निवडून देणं ही केरळच्या जनतेची भयंकर चूक आहे' असं रामचंद्र गुहा यांनी म्हटलं आहे. कठोर परिश्रम करणारे आणि सेल्फ मेड पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर पाचव्या पिढीतील राहुल गांधींचा निभाव लागूच शकत नसल्याचं देखील गुहा यांनी सांगितलं आहे. 

रामचंद्र गुहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परिश्रमाने त्यांची प्रतिमा तयार केली आहे. मोदींनी 15 वर्षे राज्य चालवलं आहे. त्यांना प्रशासकीय अनुभव आहे. ते प्रचंड कष्टाळू आहेत. युरोपात जाऊनही ते कधीच सुट्टी घालवत नाही असा टोला देखील राहुल गांधींना लगावला आहे. 2024 मध्ये राहुल गांधींना निवडून देण्याची चूक करू नका. तसं केल्यास राहुल गांधी हे नरेंद्र मोदींना फायदाच पोहोचवतील. नरेंद्र मोदी हे राहुल गांधी नाहीत हाच त्यांचा फायदा आहे. केरळच्या जनतेने राहुल गांधी यांना निवडून देऊन मोठी चूक केली आहे असं रामचंद्र गुहा यांनी म्हटलं आहे. 

महत्त्वाच्या बातम्या 

'देशात दोन मुलं जन्माला घालण्याचा कायदा असणं गरजेचं'

मुंबई-पुणे ‘हायपर लूप’ प्रकल्प ‘नको रे बाबा’; उपमुख्यमंत्री अजित पवारांची भूमिका

‘मेगा’ भरती ही भाजपाची मेगा चूक; प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची कबुली

मुंबईत २६ जानेवारीपासून नाइटलाइफ सुरू; आदित्य ठाकरेंचा प्रयोग यशस्वी होणार?

मुंबईकरांनो पाणी जपून वापरा; 'या' विभागांमध्ये पाणीपुरवठा पूर्णत: बंद

 

Web Title: kerala did disastrous thing by electing rahul gandhi says ramachandra guha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.