धक्कादायक! केरळच्या कन्नूरमधील RSS च्या कार्यालयावर बॉम्बहल्ला; घटनेने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2022 10:06 IST2022-07-12T10:05:20+5:302022-07-12T10:06:30+5:30

RSS News : पय्यानूर या गावात असणाऱ्या संघाच्या कार्यालयावर अज्ञात व्यक्तींनी बॉम्ब फेकल्याची माहिती मिळत आहे.

kerala bomb hurled at rss office in payyannur kannur | धक्कादायक! केरळच्या कन्नूरमधील RSS च्या कार्यालयावर बॉम्बहल्ला; घटनेने खळबळ

धक्कादायक! केरळच्या कन्नूरमधील RSS च्या कार्यालयावर बॉम्बहल्ला; घटनेने खळबळ

नवी दिल्ली - केरळमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. कन्नूर जिल्ह्यामधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर बॉम्बहल्ला करण्यात आला आहे. पय्यानूर या गावात असणाऱ्या संघाच्या कार्यालयावर अज्ञात व्यक्तींनी बॉम्ब फेकल्याची माहिती मिळत आहे. पय्यानूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळच्या सुमारास ही भयंकर घटना घडली असून हल्ला करण्यात आहे. 

RSS च्या कार्यालयावर करण्यात आलेल्या हल्ल्यामध्ये कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. मात्र या बॉम्बस्फोटामुळे इमारतीच्या काचा फुटल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच  कार्यालयातील फर्निचरचंही मोठ्या प्रमाणत नुकसान झाल्याचं कार्यालयामधील फोटोंमध्ये पाहायला मिळत आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला आहे. सीसीटीव्ही आणि इतर पुराव्यांच्या आधारे प्राथमिक तपास हाती घेण्यात आला असून हे कृत्य कोणी केलं याचा शोध घेतला जात आहे. परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: kerala bomb hurled at rss office in payyannur kannur