‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2026 09:16 IST2026-04-12T09:16:10+5:302026-04-12T09:16:59+5:30
Kerala Assembly Election 2026: केरळ विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होण्यापूर्वी मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा न करण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे.

‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
तिरुवनंतपुरम - केरळ विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होण्यापूर्वी मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा न करण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. पक्षांतर्गत मतभेद टाळण्यास हा निर्णय घेतल्याचा दावा काँग्रेसने शनिवारी केला. संयुक्त लोकशाही आघाडीला (यूडीएफ) निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळेल, असा विश्वास काँग्रेसने व्यक्त केला.
मुख्यमंत्री निवडण्यासाठी पक्षाची एक निश्चित कार्यपद्धती आहे आणि केरळमध्येही त्याच पद्धतीचे पालन केले जाईल असे काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी स्पष्ट केले.
कोणाची आहे चर्चा?
काँग्रेसचे खासदार के. सुधाकरन यांनी रमेश चेन्नीथला यांना मुख्यमंत्रिपदासाठी पाठिंबा दर्शवला होता. तर एर्नाकुलम जिल्हा काँग्रेस समितीचे (डीसीसी) अध्यक्ष मोहम्मद शियास यांनी, व्ही. डी. सतीशन यांचे नाव न घेता, मुख्यमंत्री याच जिल्ह्यातून असावा, असे मत व्यक्त केले होते. शियास यांची भूमिका अप्रत्यक्षपणे सतीशन यांना पाठिंबा दर्शवणारी होती. मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा सुरू झाल्यांनतर सध्याच्या परिस्थितीत अशा प्रकारची मते व्यक्त करणे योग्य नसल्याचे के. मुरलीधरन यांनी नमूद केले.