शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

केजरीवालांचा माफीनामा; भगवंत मान यांनी सोडले प्रदेशाध्यक्षपद

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2018 12:41 PM

शिरोमणी अकाली दलाचे नेते विक्रमसिंग मजिठिया यांच्यावर केलेल्या आरोपांबद्दल दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी माफी मागितल्यानंतर त्यांच्या पक्षात मात्र गोंधळ उडाला आहे. आम आदमी पार्टीचे पंजाबचे प्रदेशाध्यक्ष भगवंत मान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

नवी दिल्ली- शिरोमणी अकाली दलाचे नेते विक्रमसिंग मजिठिया यांच्यावर केलेल्या आरोपांबद्दल दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी माफी मागितल्यानंतर त्यांच्या पक्षात मात्र गोंधळ उडाला आहे. आम आदमी पार्टीचे पंजाबचे प्रदेशाध्यक्ष भगवंत मान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

मी आम आदमी पक्षाच्य़ा पंजाब अध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे. मात्र ड्रग्ज माफिया आणि पंजाबातील सर्व प्रकारच्या भ्रष्टाचाराविरोधात मी पंजाबच्या 'आम आदमी'बरोबर कायम असेन असं ट्वीट मान यांनी केलं आहे. अरविंद केजरीवाल यांनी मजिठिया हे ड्रग्जच्या व्यवसायामध्ये गुंतलेले आहेत असा आरोप केला होता मात्र त्यानंतर त्यांनी काल माफी मागत आरोप मागे घेत असल्याचे जाहीर केले. त्यांच्या या निर्णयावर मान यांनी नाराज होऊन प्रदेशाध्यक्षपद सोडले आहे.त्याबरोबरच आपचे पंजाबातील दुसरे नेते सुखपाल सिंग खैरा यांनीही केजरीवाल यांच्या माफीनाफ्यावर नाराजी व्यक्त केली आहे. पंजाब सरकारने मजिठिया यांच्याविरोधात सबळ पुरावे दाखल करुनही अरविंद केजरीवाल यांनी त्यांची माफी मागितल्यामुळे पंजाबात आम्ही सगळे (आम आदमी पभाचे नेते, कार्यकर्ते) नाराज झालो आहोत असे खैरा यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. अमृतसरच्या न्यायालयात सादर केलेल्या माफीपत्रात केजरीवाल यांनी मी नुकतेच ड्रग्ज व्यवसायांसदर्भात काही विधाने आणि आरोप केले होते. त्याचा आता राजकीय मुद्दा झाला आहे, ते आरोप चुकीचे असल्याचे असल्याचे माझ्या लक्षात येत आहे, त्यामुळे अशा मुद्द्यांवर राजकारण होऊ नये असं मला वाटतं. माध्यमे, राजकीय सभा, कार्यक्रम, सार्वजनिक सभांमध्ये मी आरोप केल्यामुळे आपण (मजिठिया) माझ्य़ावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. त्यामुळे मी आपल्यावरील सर्व आरोप मागे घेत आहे. या आरोपांमुळे आपण, आपले कुटुंबीय, मित्र, हितचिंतक, समर्थक यांना झालेल्या त्रासाबद्दल मी आपली क्षमा मागत आहे असे नमूद केले होते.

टॅग्स :Aam Admi partyआम आदमी पार्टीIndiaभारतPunjabपंजाब