शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

केजरीवाल, लोकांच्या जीवावर का उठला आहात? अलका लांबांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2020 17:49 IST

लॉकडाऊन-3 मध्ये केंद्र सरकारने दारूची दुकाने उघडण्यासाठी काही अटी घातल्या आहेत. यामध्ये सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्यास सांगितले आहे.

नवी दिल्ली - केंद्र सरकारने लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात दारूची दुकाने उघडण्यासाठी परवानगी दिली आहे. कर्नाटकात सकाळी नऊ वाजल्यापासून ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत दारूची दुकाने उघडली जाणार आहेत. दरम्यान, दारूची दुकाने उघडणार असल्याने मद्यप्रेमींनी सकाळपासूनच लांबच लांब रांगा लावल्या आहेत. कर्नाटकातील हुबळीमध्ये एका दारूच्या दुकानाबाहेर सकाळी सात वाजताच लोकांनी रांगा लावल्या होत्या. तर, राजधानी दिल्लीतही हीच परिस्थिती आहे. काँग्रेस नेत्या आणि माजी आमदार अलका लांबा यांनी एक व्हिडिओ शेअर करत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना लक्ष्य केलंय. 

लॉकडाऊन-3 मध्ये केंद्र सरकारने दारूची दुकाने उघडण्यासाठी काही अटी घातल्या आहेत. यामध्ये सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्यास सांगितले आहे. तसेच,  प्रत्येक जण मास्क लावून किंवा चेहरा झाकून दारू खरेदी साठी येईल. दरम्यान, काही ठिकाणी दारूच्या दुकानासमोर सोशल डिस्टंसिंगसाठी आखण्यात आलेल्या सर्कलवर लोक उभे असल्याचे दिसून येत आहे. देशातील जवळपास सर्वच राज्यात आणि जिल्ह्यांमध्ये हीच परिस्थिती दिसत आहे. दारुच्या दुकानाबाहेर लोकांची रांग लागली असून सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे. काँग्रेस नेत्या अलका लांबा यांनी एक व्हिडिओ शेअर करत दिल्लीतील दारु दुकानाबाहेर लागलेल्या रांगा आणि गर्दीवरुन अरविंद केजरीवाल यांना टार्गेट केलं आहे. दारु दुकानाबाहेरील या रांगांमध्ये कुठेही सोशल डिस्टन्सचे पालन दिसत नाही, किंवा लोकांना दारुपुढे कोरोनाचं काहीच वाटत नाही, असेच दिसून येत आहे. 

अलका लांबा यांनी हा व्हिडिओ शेअर करताना, हे राम... असे कॅप्शन दिलंय. त्यासोबतच, केजरीवाल, लोकांच्या जीवावर का उठलायंत ? असा प्रश्न लांबा यांनी विचारला आहे. 

दरम्यान, आम आदमी पक्षाचे माजी नेते डॉ. कुमार विश्वास यांनीही मैराज फैदाबादी यांची शायरी ट्विट करत दारु दुकानाबाहेर लागलेल्या रांगांबद्दल मत व्यक्त केलं आहे.  

मैकदे में किसने कितनी पी ख़ुदा जाने मगर,मैकदा तो मेरी बस्ती के कई घर पी गया..!”

अशी आशयपूर्ण शायरी ट्विट करुन कुमार विश्वास यांनी दारुमुळे गोरगरीब आणि गरिब वस्तीतील कुटुंबीयांची व्यथा आपल्या शब्दातून मांडली आहे. दारुसाठी लागलेली रांग हे नक्कीच निराशावादी चित्र असल्याचे विश्वास यांनी आपल्या ट्विटमधून सूचवलंय.  

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालdelhiदिल्लीliquor banदारूबंदीTwitterट्विटरcongressकाँग्रेस