शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

केजरीवाल-सिसोदियांची निर्दोष मुक्तता;"अशी सुमार चार्जशीट मी आयुष्यात पाहिली नाही!" सीबीआयला कोर्टाने झापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 12:17 IST

दिल्लीतील राऊज एव्हेन्यू कोर्टाने माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची सर्व आरोपातून निर्दोष मुक्तता केली आहे.

दिल्लीच्या राजकारणात गेल्या अनेक महिन्यांपासून वादळ निर्माण करणाऱ्या 'मद्य धोरण घोटाळा' प्रकरणात आज ऐतिहासिक निकाल लागला आहे. दिल्लीतील राऊज एव्हेन्यू कोर्टाने माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची सर्व आरोपातून निर्दोष मुक्तता केली आहे. विशेष म्हणजे, हा निकाल देताना विशेष न्यायाधीश जितेंद्र सिंह यांनी तपास यंत्रणेच्या कामावर अत्यंत कडक शब्दांत ताशेरे ओढले असून, "इतक्या चुका असलेले दोषारोपपत्र मी आजवर कधीच पाहिले नाही," असे स्पष्टपणे म्हटले आहे.

"फाईल्स माझ्याशी बोलू लागल्या!"

सुनावणी दरम्यान न्यायाधीश जितेंद्र सिंह यांनी सीबीआयच्या तपासातील त्रुटींवर बोट ठेवले. ते म्हणाले, "जेव्हा तुम्ही खूप फाईल्स वाचता, तेव्हा फाईल्स स्वतः तुमच्याशी बोलू लागतात. मी पहिल्यांदाच अशी चार्जशीट पाहत आहे ज्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात उणिवा आहेत. सीबीआयने सादर केलेले दस्तऐवज आणि त्यांचे दोषारोपपत्र यामध्ये कुठेही ताळमेळ बसत नाही." देशातील प्रत्येक नागरिकाला निष्पक्ष सुनावणीचा अधिकार असल्याचेही कोर्टाने यावेळी ठणकावून सांगितले.

साऊथ लॉबी आणि पुराव्यांचा अभाव

न्यायालयाने सीबीआयच्या वकिलांना प्रामाणिकपणे तथ्य मांडण्याची तंबी दिली. "सीबीआयने चेन्नई कोर्टातही असेच दोषारोपपत्र दाखल केले होते आणि तिथे 'साऊथ लॉबी' असा उल्लेख केला होता. हा शब्द नेमका आला कुठून?" असा सवाल न्यायालयाने उपस्थित केला. तसेच, वारंवार मागणी करूनही कॉन्फेशनल स्टेटमेंट सादर न केल्याबद्दल न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. सीबीआयने माहिती सीलबंद पाकिटात दिली असल्याचा दावा केला, मात्र कोर्टाचे समाधान होऊ शकले नाही.

गुन्हेगारी कट सिद्ध करण्यात यंत्रणा अपयशी

अरविंद केजरीवाल यांना या प्रकरणात आरोपी क्रमांक १८ बनवण्यात आले होते. मात्र, मद्य धोरण तयार करण्यामागे कोणताही गुन्हेगारी कट किंवा चुकीचा हेतू होता, याचे ठोस पुरावे सादर करण्यात तपास यंत्रणा पूर्णपणे अपयशी ठरली. कोणत्याही पुराव्याअभावी कोणालाही दोषी धरता येणार नाही, असे सांगत न्यायालयाने केजरीवाल, सिसोदिया आणि इतर सहकाऱ्यांना क्लिन चिट दिली आहे.

या निकालामुळे आम आदमी पक्षाला मोठा राजकीय दिलासा मिळाला आहे. "सत्याचा विजय झाला आहे," अशी प्रतिक्रिया 'आप' कडून देण्यात आली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Kejriwal, Sisodia acquitted; Court slams CBI's shoddy chargesheet.

Web Summary : Kejriwal and Sisodia were acquitted in the liquor policy case. The court strongly criticized the CBI's investigation, citing a lack of evidence and significant flaws in the chargesheet. The court emphasized the right to a fair trial, highlighting the CBI's failure to prove criminal conspiracy.
टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालManish Sisodiaमनीष सिसोदियाdelhiदिल्ली