आता दक्षिण भारतावर केजरीवालांची नजर; 'या' मोठ्या राज्यात सर्वच्या सर्व 224 जागा लढवणार, भाजपला देणार टक्कर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2022 19:35 IST2022-10-30T19:34:12+5:302022-10-30T19:35:40+5:30
'आप' नेत्याने म्हटले आहे, की पक्ष आधीपासूनच अर्ध्यावर उमेदवारांची नावे निश्चित करण्याच्या प्रक्रियेत आहे आणि जानेवारी 2023 च्या पहिल्या आठवड्यापर्यंत आपली पहिली यादी जारी करणे अपेक्षित आहे. यानंतर 'आप'च्या उमेदवारांची पहिली यादी घोषित केली जाईल.

आता दक्षिण भारतावर केजरीवालांची नजर; 'या' मोठ्या राज्यात सर्वच्या सर्व 224 जागा लढवणार, भाजपला देणार टक्कर!
अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पार्टीने (आप) आता दक्षिण भारताकडे आपला मोर्चा वळविण्याचा निर्णय घेतला आहे. आता आप दक्षीण भारतात आपली पाळेमुळे मजबूत करण्याच्या प्रयत्नात आहे. यासाठी त्यांनी आगामी कर्नाटक विधानसभा निवडणुकीत सर्वच्या सर्व 224 जागांवर आपले उमेदवार उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात खुद्द आम आदमी पक्षाच्या एका नेत्याने माहिती दिली आहे. सध्या कर्नाटकात भाजप सत्तेवर आहे. यामुळे, आम आदमी पक्षाने येथे उमेदवार उतरवले, तर त्यांचा सामना अर्थातच भाजपशी असेल.
'आप' नेत्याने म्हटले आहे, की पक्ष आधीपासूनच अर्ध्यावर उमेदवारांची नावे निश्चित करण्याच्या प्रक्रियेत आहे आणि जानेवारी 2023 च्या पहिल्या आठवड्यापर्यंत आपली पहिली यादी जारी करणे अपेक्षित आहे. यानंतर 'आप'च्या उमेदवारांची पहिली यादी घोषित केली जाईल.
पक्षाचे प्रवक्ते आणि आपच्या कर्नाटक युनिटचे संयोजक पृथ्वी रेड्डी म्हणाले, आम्ही सर्वच्या सर्व 224 जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही राज्याच्या 170 मतदारसंघांमध्ये ग्राम संपर्क अभियानाच्या माध्यमातून आमचा निवडणूक प्रचारही सुरू केला आहे. या शिवाय आमची या 170 मतदारसंघांमध्ये बूथ स्तरावर लोकांची नियुक्ती करण्याची प्रक्रियाही सुरू आहे. राज्यात जवळपास 58,000 बूथ असून, पक्ष प्रत्येक बूथवर किमान 10 कार्यकर्त्यांची नियुक्ती करत आहे.
याच बरोबर, आम्ही बूथ स्तरावर काम करून पक्ष मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पद्धतीने आम्ही धन शक्तीविरुद्ध लढू शकतो. बूथ लेव्हल वरील कार्यकर्त्यांना त्यांच्या भागातील लोकांचे प्रश्न उचलण्याचे काम सोपविण्यात आले आहे. आपला कर्नाटकात प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. कारण राज्यातील भ्रष्टाचाराला लोक कंटाळले आहेत, असेही रेड्डी यांनी म्हटले आहे.