शहरं
Join us  
Trending Stories
1
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
2
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
3
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
4
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
5
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
6
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
7
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
8
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
9
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
10
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
11
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
12
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
13
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
14
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
15
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
16
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
17
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
18
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
19
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
20
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका

मानहानी प्रकरणात केजरीवालांनी काँग्रेस नेत्याची लेखी स्वरूपात मागितली माफी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2017 5:12 PM

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी सोमवारी काँग्रेस नेते आणि माजी खासदार अवतार सिंह भडाना यांच्या मानहानी प्रकरणात माफी मागितली आहे.

नवी दिल्ली, दि. 21 - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी सोमवारी काँग्रेस नेते आणि माजी खासदार अवतार सिंह भडाना यांच्या मानहानी प्रकरणात माफी मागितली आहे. काँग्रेस नेते अवतार सिंह भडाना यांनी पतियाळा हाऊस कोर्टात केजरीवालांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल करून 1 कोटींची नुकसानभरपाईची मागणी केली होती. त्यावर केजरीवाल यांनी बिनशर्त माफी मागितली आहे. एका सहका-याच्या नादाला लागून ही भडाना यांच्यावर आरोप केल्याचं केजरीवालांनी सांगितलं आहे.केजरीवाल यांनी 31 जानेवारी 2014ला वादग्रस्त वक्तव्य केल्याचा भडाना यांनी आरोप केला आहे. भडाना देशातील सर्वात भ्रष्ट व्यक्तींमधील एक आहेत. मात्र भडाना यांनी प्रतिष्ठित व्यक्ती असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर भडाना यांनी केजरीवालांच्या त्या विधानाविरोधात न्यायालयात दाद मागितली. केजरीवालांच्या विधानामुळे माझी सामाजिक प्रतिष्ठा मलिन झाल्याचं भडाना म्हणाले आहेत. भडाना यांनी केजरीवालांना कायदेशीर नोटीस पाठवून विधान मागे घेण्यासोबतच बिनशर्त माफीचीही मागणी केली होती. त्यानंतर केजरीवालांनी विधान मागे  घेण्यासोबतच भडाना यांची माफी मागण्यास नकार दिला होता. त्यानंतर आज पटियाळा हाऊस कोर्टात भडाना यांना लेखी स्वरूपात केजरीवालांना माफीनामा दिला आहे. सहका-याच्या नादाला लागून मी आरोप लावल्याचं केजरीवाल म्हणाले आहेत. चौकशीतून त्या आरोपांची शहानिशा झाली नाही. त्यामुळेच मी माफी मागितल्याचं केजरीवाल म्हणाले. तसेच भडाना यांच्या आरोप करून त्यांची सामाजिक प्रतिष्ठा मलिन करण्याचा माझा कोणताही उद्देश नसल्याचंही ते म्हणाले आहेत. भडाना यांच्याशिवाय केजरीवालांविरोधात अनेक मानहानीची प्रकरणं दाखल आहेत.अरुण जेटलींच्या मानहानी खटल्याचीही कोर्टात केस सुरू आहे. आम आदमी पार्टीच्या पाच नेत्यांविरोधात जेटलींनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यातील सुनावणीवेळी जेटलींना अपमानास्पद प्रश्न विचारू नये, असे निर्देश दिल्ली उच्च न्यायालयानं आपच्या नेत्यांना दिले होते. तसेच या प्रकरणात कोर्टानं केजरीवालांना 10 हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. न्यायमूर्ती मनमोहन म्हणाले, मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी केंद्रीय अर्थमंत्री जेटलींशी सन्मानानं आणि कायद्याच्या भाषेनुसार त्यांचा आदर केला पाहिजे. कायदा आणि सुव्यवस्था टिकवून ठेवली पाहिजे. न्यायालयात अभद्र भाषेचा कोणीही वापर करू नये. तसेच मानहानी खटल्यात योग्य रीतीनं जबाब नोंदवून घेतले पाहिजेत. जेटली मानहानी प्रकरणात केजरीवालांसह राघव चड्ढा, कुमार विश्वास, आशुतोष, संजय सिंह आणि दीपक वाजपेयींनाही आरोपी बनवण्यात आलं आहे. अरुण जेटलींनी 2000 ते 2013मध्ये डीडीसीएच्या अध्यक्षपदावर असताना भ्रष्टाचार केल्याचा आरोप आप नेत्यांनी केला होता. जेटलींनी ते आरोप फेटाळूनही लावले आहेत. 

टॅग्स :Aam Admi partyआम आदमी पार्टी