केजरीवाल जोड :
By Admin | Updated: February 16, 2015 23:55 IST2015-02-16T23:55:11+5:302015-02-16T23:55:11+5:30
सिसोदियांनी घेतला पत्रपरिषदेतून काढता पाय

केजरीवाल जोड :
स सोदियांनी घेतला पत्रपरिषदेतून काढता पायनवी दिल्ली : दिल्लीतील आम आदमी पार्टी(आप)सरकारने सोमवारी पत्रकारांशी नाराजी ओढवून घेतली़ पहिल्यावहिल्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयांची माहिती देण्यासाठी सोमवारी बोलविण्यात आलेल्या पत्रपरिषदेत उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि पत्रकारांत खडाजंगी उडाली़ यानंतर सिसोदिया पत्रपरिषद सोडून निघून गेले़आप सरकारने मीडियाला सचिवालयात जाण्यास मज्जाव केल्याचा आरोप पत्रकारांनी यानिमित्ताने केला़ पत्रकारांना सचिवालयाच्या आत जाण्यापासून रोखण्यात आले़ यात मान्यताप्राप्त पत्रकारांचाही समावेश होता़ मंत्रिमंडळाची बैठक आटोपून बाहेर आलेले मनीष सिसोदिया यांच्याकडे पत्रकारांनी याबाबत तक्रार नोंदवली़ पत्रकारांनी सिसोदिया यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला़ मात्र सिसोदिया यांनी या प्रश्नांना उत्तर देण्याऐवजी तेथून काढता पाय घेतला़दरम्यान, आम आदमी पार्टीने पत्रकारांना सचिवालयात परवानगी नाकारल्याच्या मुद्यावर कानावर हात ठेवले़ हा निर्णय सचिवालयात आधीपासून काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा होता़ पत्रकारांना माहिती देण्यासाठी वेळ आणि ठिकाण निश्चित करण्यात आले आहे़ मात्र याउपरही सरकार अधिकाऱ्यांशी चर्चा करून या मुद्यावर तोडगा काढण्याचे प्रयत्न करेल, असे पक्षप्रवक्ते आतिशी मलेर्ना यांनी सांगितले़